शिंदखेडा (जि. धुळे) : व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या महिला विंगच्या शिंदखेडा शहराध्यक्षपदी सौ. शोभा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय सरचिटणीस दिव्या भोसले, प्रदेशाध्यक्ष (पितृ कार्यकारिणी) अनिल मस्के, तसेच प्रदेशाध्यक्ष रश्मी मारवाडी आणि सविता चंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जनसंपर्क प्रमुख उज्वला बागुल यांनी ही नियुक्ती जाहीर केली.
सौ. शोभा पाटील यांच्या पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरीचा विचार करून त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे संघटनेला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच मूल्याधारित पत्रकारिता जपण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया कार्यरत असून, या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी सौ. पाटील प्रभावीपणे कार्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
त्यांना आपल्या कार्यक्षेत्रात पदाधिकारी व कार्यकारिणीची निवड करून संघटनात्मक कामाला गती देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
या नियुक्तीबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहे.
व्हॉईस ऑफ मीडियामध्ये प्रभावीपणे काम करेन -सौ. शोभा पाटील
नियुक्तीबद्दल मनोगत व्यक्त करताना सौ. शोभा पाटील म्हणाल्या, “जो विश्वास माझ्यावर ठेवला आहे, तो मी नक्कीच सार्थ ठरवेन. पत्रकारितेच्या क्षेत्रात तसेच व्हॉईस ऑफ मीडियामध्ये प्रामाणिकपणे व प्रभावीपणे काम करेन अशी ग्वाही व्यक्त केली.


