भु

सावळ (प्रतिनिधी) – गौमातेला अधिकृतपणे ‘राष्ट्रमाता’ घोषित करावे, देशभरात गोहत्येवर संपूर्ण बंदी लागू करावी आणि गोसंरक्षणासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी देशातील सर्व तहसील कार्यालयात एकाच दिवशी गोमाता अभियानाअंतर्गत निवेदन देण्यात आले याच अनुषंगाने भुसावळ येथील विविध सामाजिक, धार्मिक आणि गौभक्त गोसेवक संघटनांनी सोमवार २७ एप्रिल २०२६ रोजी तहसीलदार नीता लबडे यांच्याकडे निवेदन सादर केले. या निवेदनाद्वारे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत जनभावना पोहोचवण्याची मागणीही करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, भारतीय संस्कृतीत गौमातेचे स्थान अत्यंत पवित्र असून ती केवळ एक पशू नसून परंपरा, श्रद्धा आणि कृषीव्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे. गौमाता ही कृषी आणि आरोग्य व्यवस्थेचा आधार मानली जाते. मात्र, देशातील अनेक भागांत गोवंशाची दयनीय अवस्था असून गोहत्या सुरू असल्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
प्रमुख मागण्या
निवेदनात तीन महत्त्वाच्या मागण्या पुढे करण्यात आल्या आहेत. त्यापैकी तिसरी मागणी म्हणजे निराश्रित गोवंशासाठी प्रत्येक ब्लॉकमध्ये आवश्यक सुविधा असलेल्या गोशाळा उभाराव्यात आणि त्यांना शासनाकडून नियमित अनुदान द्यावे. यामुळे रस्त्यावर भटकणाऱ्या जनावरांची समस्या कमी होऊन गोसंरक्षण अधिक प्रभावी होईल, असे नमूद करण्यात आले आहे.
हजारो स्वाक्षऱ्यांसह निवेदन
हे निवेदन नंदग्राम गोधाम, अंजाळे, श्री राधाकृष्ण प्रभातफेरीचे राधेश्याम लाहोटी,भुसावळ अखिल भारतीय बहुभाषीय ब्राह्मण संघटना, माहेश्वरी समाज, अग्रवाल समाज, अखिल भारतीय जैन संघटना, प्रतिष्ठा महिला मंडळ आदी संघटनांच्या वतीने सादर करण्यात आले. निवेदनासोबत हजारो नागरिकांच्या स्वाक्षऱ्या जोडण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
अष्टभुजा देवी माता मंदिर ते तहसील कार्यालय
रणरणत्या उन्हात महाले यांनी अष्टभुजा देवी माता मंदिर ते तहसील कार्यालय अनवाणी पायांनी रॅलीत प्रवास केला राज्यात आजही कसाई गोतस्कराकडुन गोमाता गोवंश हत्या सुरुच आहे हि राज्याची शोंकातीका आहे
गोमाता गोवंश हत्या बंद करावी कसाईला कठोर शिक्षा व्हावी
तसे नाही झाल्यास असंख्य संत महात्मा गोभक्त गोरक्षक अन्नपाणी त्यागणार असा इशारा देखील देण्यात आला आहे जनभावनांचा आदर राखत गौमातेच्या सन्मान आणि सुरक्षेसाठी तातडीने निर्णय घ्यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
यावेळी नगराध्यक्षा सौ गायत्री गौर/भंगाळे, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ रजनी सावकारे, नगरसेवक बबलू ब्रहाटे, श्री राधाकृष्ण प्रभातफेरीचे राधेश्याम लाहोटी, नंदग्राम गोधाम अंजाळेचे संचालक व गोसेवक अभिलाष नागला , गोसेवक रोहीत महाले, संत गेंदालाल महाराज ,विजुजी महाराज शितल चौधरी, महिमा कोलते, रितेश जैन ,जीतु जाट ,बल्लु धायडे, कुणाल शिंदे ,शुभम रुमकर ,भुषण महाजन, उमेश जोशी ,अनिकेत पाटील ,कृष्णा साळी ,चेतन ठाकुर ,किरण पाटील, अनिकेत साळी, सोरभ यादव , l यांच्यासह भुसावळमधील अनेक गोप्रेमी आणि गोसेवक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सर्व गोसेवक यांनी परिश्रम घेतले.


