पत्रकारांच्या कल्याणासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची देशव्यापी झेप; राष्ट्रीय अध्यक्षांच्या पहिल्या बैठकीत विस्ताराचा संकल्प : देशभरातील पत्रकारिता क्षेत्राला मिळणार नवी दिशा – अनिल म्हस्के पाटील

नवी दिल्ली : पत्रकारांच्या सर्वांगीण कल्याणासाठी कार्यरत असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमने देशव्यापी विस्ताराचा ठोस संकल्प करत नवे पर्व सुरू केले आहे. नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडलेली पहिली महत्त्वपूर्ण बैठक संघटनेच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरली असून, या बैठकीत राष्ट्रीय स्तरावर विस्ताराची अधिकृत मुहूर्तमेढ रोवण्यात आली. या बैठकीला संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे आणि आंतरराष्ट्रीय सरचिटणीस दिव्या भोसले यांची विशेष उपस्थिती लाभली होती.
बैठकीत ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने महाराष्ट्रात उभारलेल्या यशस्वी संघटन मॉडेलचा सखोल आढावा घेण्यात आला. पत्रकारांचे संघटन मजबूत करताना त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि व्यावसायिक प्रश्नांवर ज्या पद्धतीने ठोस काम करण्यात आले, त्याच धर्तीवर आता देशातील सर्व राज्यांमध्ये हे मॉडेल राबवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रातील अनुभव आणि यश याला राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के पाटील यांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे नमूद केले की, ही बैठक केवळ औपचारिक नसून एका नव्या युगाची सुरुवात आहे. देशातील प्रत्येक पत्रकाराला संकटाच्या काळात एक सक्षम आधार मिळावा, त्याला आपल्या हक्कासाठी आवाज उठवता यावा आणि त्याच्या मागे संघटनेचे बळ उभे राहावे, हा संघटनेचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक राज्यात सक्षम आणि सक्रिय नेतृत्व उभे करून पत्रकारांच्या हक्कासाठी राष्ट्रीय स्तरावर बुलंद आवाज निर्माण करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.
संस्थापक संदीप काळे यांनी संघटनेच्या जागतिक कार्याचा उल्लेख करताना सांगितले की, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आज ७८ देशांमध्ये पोहोचली असली तरी भारतीय पत्रकारितेतील तळागाळातील प्रश्न सोडवणे हेच संघटनेचे प्रमुख ध्येय आहे. पत्रकार हा समाजाचा आरसा असतो, मात्र त्यालाच अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे संघटनेचे कार्य केवळ विस्तारापुरते मर्यादित न ठेवता पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबांना सुरक्षिततेचे कवच देणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
आंतरराष्ट्रीय सरचिटणीस दिव्या भोसले यांनी संघटनेच्या धोरणात्मक आणि प्रशासकीय नियोजनाविषयी माहिती देताना सांगितले की, विविध देशांतील पत्रकार संघटनांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करून भारतासाठी एक प्रभावी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष संपर्क यांचा समन्वय साधत दिल्लीपासून ते देशातील शेवटच्या खेड्यातील पत्रकारापर्यंत पोहोचण्याचा संघटनेचा मानस असून, राष्ट्रीय अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण टीम देशभर कार्य करण्यासाठी सज्ज झाली आहे.

या बैठकीला देशातील विविध राज्यांतील प्रदेशाध्यक्ष प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. हरियाणातून प्रदेशाध्यक्ष बन्सीलाल पंचाल, रणधीर सिंग, रघुबीर सिंग आणि सचिन चांदपूर उपस्थित होते. हिमाचल प्रदेशातून विकास शर्मा, भूषण शर्मा, रशपाल सिंग आणि शांती गौतम सहभागी झाले. कर्नाटकातून ए.पी. रविकुमार आणि वासू उपस्थित होते, तर केरळमधून जॉय वर्गीस एरुमेडा आणि गिनेस सुनील जोसेफ सहभागी झाले. मध्य प्रदेशातून दीपक शर्मा, राजीव त्रिपाठी, रानू पांडे आणि दीपक कंकर उपस्थित होते. महाराष्ट्रातून विजय चोरडिया, दिगंबर महाले, नरेंद्र देशमुख आणि अजित कुंकुलोळ सहभागी झाले. मणिपूरमधून ज्योतिंद्रो सिंग, हाजारिमयुम बाबिना देवी, रेबिका मोइरांगथेम आणि नोंगथोंबाम एलिझाबेथ उपस्थित होते.
मेघालयातून किर्मेनलांग उरियाह आणि बाबुल डाखर सहभागी झाले, तर नागालँडमधून मॅक्स खियेया आणि थेजंगुनुओ चाडी उपस्थित होते. ओडिशातून डॉ. प्रवात कुमार मिश्रा, सुकांत कुमार परिदा, शेख साहिद होस्सेन आणि अक्षय कुमार सराफ सहभागी झाले. पंजाबमधून अंकुश जैन, राजस्थानमधून गोपाल गुप्ता, नारायण सेन आणि कमल झोटा उपस्थित होते. तामिळनाडूमधून बाळाजी ए., के. मुरुगेशन आणि एम. पांडियाराज सहभागी झाले. तेलंगणातून सुश्री संगीता उपस्थित होत्या. त्रिपुरामधून कौशिक अधिकारी, मणी देबनाथ, प्रदीप घोष आणि अजय पॉल सहभागी झाले.
उत्तर प्रदेशातून प्रेम पाठक, उत्तराखंडमधून वेणी राम उनियाल, दिनेश सिंह पंवार, दिनेश पाल गुसाईं आणि जीवन सिंह उपस्थित होते. पश्चिम बंगालमधून सुमन गांगुली, रानिता घोषाल, आर. श्वप्नानिल चॅटर्जी आणि अनिरुद्ध पाल सहभागी झाले. जम्मू-काश्मीरमधून अक्षीत महाजन आणि अमरीक सिंग उपस्थित होते. पुदुच्चेरीमधून एम. कार्तिकेयन आणि आंध्र प्रदेशातून व्ही. बालाजी सहभागी झाले.

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने पत्रकारांच्या आयुष्यात केवळ व्यावसायिकच नव्हे, तर सामाजिक परिवर्तन घडवून आणले आहे. संघटनेमार्फत हजारो पत्रकारांना आरोग्य विम्याचे संरक्षण देण्यात आले असून, गंभीर आजारांच्या वेळी तातडीची वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करण्यात आले आहे. पत्रकारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, कुटुंबांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी विविध उपक्रम, ग्रामीण पत्रकारांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, पत्रकारांवरील हल्ल्यांविरोधात कायदेशीर मदत केंद्र आणि ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम’च्या माध्यमातून विधायक पत्रकारितेचा प्रसार, या उपक्रमांमुळे संघटनेने वेगळी ओळख निर्माण केली आहे.
या ऐतिहासिक बैठकीमुळे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या राष्ट्रीय कार्याला नवी गती मिळाली असून, देशभरातील पत्रकारांना एक सक्षम व्यासपीठ आणि सुरक्षित आधार मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. पत्रकारितेतील मूल्ये आणि पत्रकारांचे कल्याण यांचा समतोल साधत संघटना आता देशभरात परिवर्तनाचे नवे पर्व घडविण्यास सज्ज झाली आहे.
फोटो कॅप्शन : ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अनिल म्हस्के पाटील यांचे स्वागत करताना आंतरराष्ट्रीय महासचिव तथा संचालक चंद्रमोहन पुपाला.