परशुराम चरित्र समजून घेणे काळाची गरज – अनघा कुलकर्णी : ब्राम्हण संघ व परशुराम जन्मोत्सव समिती तर्फे व्याख्यानाचे आयोजन

भुसावळ (प्रतिनिधी ) – भगवान परशुराम यांच्या विषयीचे गैरसमज दुर करायचे असतील तर त्यांचे चरित्र समजुन घेणे गरजेचे आहे. त्यांनी शस्त्र व शास्त्राचा वापर उत्कटपणे जीवनमुल्यांवर आधारीत असाच केला. असे मत परशुराम चरित्राच्या अभ्यासक अनघा कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ब्राम्हण संघ व परशुराम जन्मोत्सव समिती तर्फे आयोजित व्याख्यानात ‘ भगवान परशुराम जीवनी’ या विषयावर त्या बोलत होत्या.
ब्राम्हण संघाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात ऋषिकेश येथील जीवन विद्या परीषदेचे राजेश बहुगुणा, भुसावळ शाखेचे प्रमुख मनोहर जाधवांनी, गायत्री शक्तीपीठाचे शामचरण गुप्ता,ब्राह्मण संघाचे अध्यक्ष गणेश वढवेकर, उपाध्यक्ष गजानन जोशी, सचिव महेंद्र गोडबोले, समितीचे अध्यक्ष वेदप्रकाश ओझा आदी व्यासपीठावर उपस्थित होते. अनघा कुलकर्णी पुढे म्हणाल्या भगवान परशुरामाचे चरित्र कोणी वाचल नाही. मुळात त्याचे चरित्र आहे हेच अनेकांना माहीत नाही. परशुरामाचे चरित्र संस्कृत भाषेत आहे. कमी श्लोकात आहे पण त्यातुनही परशुराम समजुन घ्यायला मदत होते. अनेक अभ्यासकांनी मराठी भाषेतही त्यांच्या विषयी लेखन केले आहे. परशुरामाचे खरे नाव रामभद्र असे होते. भद्र याचा अर्थ दुसऱ्याचे कल्याण करणारा. भृगु वंशात जन्मला म्हणून भार्गव देखील म्हंटले जात होते. परशुरामांचा उल्लेख ऋग्वेदात, श्रीमद भागवत ग्रंथात, महाभारत व रामायणात देखील आहे. परशुराम जसे शक्ती स्वरूपात आहेत तसेच शास्त्र स्वरुपातही आहे. शस्त्राचा वापर संयमाने केला. दुराभिमानी व अहंकारी प्रवृत्तीचा त्यांनी नाश केला. शास्त्राची साथ कधी सोडली नाही. त्यांचे आई वरील प्रेम व वडिलांवर विश्वास होता. २१ वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली त्यावेळी महिला व लहान मुलांवर त्यांनी हल्ला केला नाही. असे कुलकर्णी म्हणाल्या.

गणेश वढवेकर म्हणाले हिंदू धर्माच्या विरोधात षडयंत्र सुरू आहे म्हणून हिंदू समाजाने जात-पात विसरून व अति सहिष्णुता त्यागून किमान संरक्षता वृत्ती तरी बाळगणे ही काळाची गरज आहे असे वडवेकर म्हणाले. त्याचबरोबर ब्राह्मण संघाला शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल प्रकाशित होणाऱ्या स्मरणिके संदर्भात माहिती त्यांनी यावेळी देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी राजेश बहुगुणा, शामचरण गुप्ता यांचेही भाषण झाले. ब्राम्हण संघाचे भालचंद्र उर्फ पंकज जोशी यांनी सुत्रसंचलन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कोषाध्यक्ष अमोद टेंभुर्णीकर, संजय बोचरे, अतुल जोशी, जयंत जोशी, शंतनू गचके, कल्पना दामले, वैशाली एकलारकर, राजश्री पाठक, अशोक पाटील, यश इंगळे, प्रतीक बोचरे, अभिनंदन श्याम राम माहूरकर व परशुराम जन्मोत्सव समितीचे सर्व सहकारी आदींनी परिश्रम घेतले.

शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ऋषिकेश येथील जीवन विद्या परिषदेचे राजेश बहुगुणा, भुसावळ शाखेचे प्रमुख मनोहर जाधव, गायत्री शक्तीपीठाचे शामचरण गुप्ता, ब्राह्मण संघाचे अध्यक्ष गणेश वढवेकर, उपाध्यक्ष गजानन जोशी, सचिव महेंद्र गोडबोले, समितीचे अध्यक्ष वेदप्रकाश ओझा आदी मान्यवर उपस्थित होते.

अनघा कुलकर्णी यांनी पुढे सांगितले की, भगवान परशुरामांचे मूळ नाव रामभद्र असून ‘भद्र’ म्हणजे दुसऱ्याचे कल्याण करणारा. भृगु वंशात जन्म झाल्याने त्यांना ‘भार्गव’ असेही संबोधले जाते. परशुरामांचा उल्लेख ऋग्वेद, श्रीमद भागवत, महाभारत आणि रामायण यांसारख्या ग्रंथांमध्ये आढळतो. त्यांनी शस्त्र आणि शास्त्र यांचा समतोल वापर करत जीवनमूल्यांवर आधारित कार्य केले. अहंकारी व दुराभिमानी प्रवृत्तीचा नाश करताना त्यांनी संयम राखला, असेही त्या म्हणाल्या.

तसेच, पृथ्वी २१ वेळा क्षत्रियविहीन करतानाही त्यांनी महिला व लहान मुलांवर कधीही आघात केला नाही, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात गणेश वढवेकर यांनी हिंदू समाजाने जात-पात विसरून एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. तसेच ब्राह्मण संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त प्रकाशित होणाऱ्या स्मरणिकेसाठी सहकार्याचे आवाहन केले.

यावेळी राजेश बहुगुणा आणि शामचरण गुप्ता यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भालचंद्र उर्फ पंकज जोशी यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोद टेंभुर्णीकर, संजय बोचरे, अतुल जोशी, जयंत जोशी, शंतनू गचके, कल्पना दामले, वैशाली एकलारकर, राजश्री पाठक, अशोक पाटील, यश इंगळे, प्रतीक बोचरे, अभिनंदन श्याम राम माहूरकर तसेच परशुराम जन्मोत्सव समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.