साकरी येथे किरकोळ कारणावरून तरुणास बेदम मारहाण: आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल :

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ तालुक्यातील साकरी गावात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणावर सामूहिक मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशन येथे आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनील सुरेश तायडे (वय ४८, रा. तपत कठोरा, ता. भुसावळ) यांनी फिर्याद दिली की, २३ मार्च २०२६ रोजी सकाळी ९:३० ते १० वाजण्याच्या सुमारास साकरी गावातील किन्ही रोडवरील खोकली माता मंदिरासमोर फिर्यादीचा मुलगा हेमराज हा साकरी गावात कार घेऊन आल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. यानंतर संशयीत आरोपीं प्रवीण जयराम बाविस्कर, दिनेश जयराम बाविस्कर, मोहन जयराम बाविस्कर, विकास कौतिक काकडे, सागर प्रभाकर सोनवणे, संजु आत्माराम तोंडे, माधुरी प्रवीण बाविस्कर व सुरेखा मोहन बाविस्कर (सर्व रा. साकरी, ता. भुसावळ) यांनी संगनमत करून बेकायदेशीररीत्या जमाव जमवला व हातातील लाकडी दांडे व फावड्याचे दांडे वापरून त्याला मारहाण केली. या मारहाणीत हेमराज याच्या पाठीवर, हातापायांवर, डोक्यावर व खांद्यावर मारले मार लागून तो जखमी झाला. तसेच आरोपींनी शिवीगाळ करत “विहिरीत फेकून देऊन जीवे ठार मारू” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या दिलेल्या फिर्यादीवरून गु.र. नं. ००६५/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १८९(२), १८९(४), १९०, १९१(२), १९१(३), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(३) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून या प्रकरणी संशयीत प्रवीण जयराम बाविस्कर, दिनेश जयराम बाविस्कर, मोहन जयराम बाविस्कर, विकास कौतिक काकडे, सागर प्रभाकर सोनवणे, संजु आत्माराम तोंडे, माधुरी प्रवीण बाविस्कर व सुरेखा मोहन बाविस्कर (सर्व रा. साकरी, ता. भुसावळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड करीत आहेत.