भुसावळ (प्रतिनिधी)-डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच, भुसावळ यांच्या वतीने भुसावळ तालुक्यातील इयत्ता ३री ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी पुढील विषय देण्यात आले आहेत –
- संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- भारतीय संविधान
- भारतातील लोकशाही
स्पर्धकांनी वरील तीन विषयांपैकी एका विषयावर निबंध लिहून दि. १ एप्रिलपर्यंत यशवंत कॉलनी, नाहाटा कॉलेज समोर, भुसावळ – ४२५२०१ (जि. जळगाव)प या त्त्यावर पाठवावा
सर्व सहभागी स्पर्धकांमधून तीन उत्कृष्ट निबंधांची निवड करण्यात येणार असून विजेत्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र पुस्तक बक्षीस म्हणून प्रदान करण्यात येईल. अधिक माहितीसाठी संपर्क :
डॉ. दिलीप सुखाडे (संयोजक) , मो. 9049822600 यावर संपर्क साधावा विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.


