भुसावळ (प्रतिनिधी ) – व्यसनमुक्त समाज हेच राष्ट्रनिर्मितीचे पहिले पाऊल आहे.असे प्रतिपादन ऍड निलेश भंडारी यांनी केले . विधी सेवा समितीतर्फे ‘अंमली पदार्थांचे दुरुपयोग ’ या विषयावर भुसावळ तालुक्यातील श्रीकृष्ण हायस्कुल शिंदी येथे राष्ट्रीय बाल दिनानिमित्त प्राथमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे दुष्परिणाम या विषयावर कायदेविषयक जनजागृती वा प्रबोधन शिबिर गुरुवार रोजी घेण्यात आले.प्रसंगी ऍड भंडारी यांनी मार्गदर्शन केले . यावेळी व्यासपीठावर ऍड निलेश भंडारी ,मुख्याध्यापक भास्कर वारके सर यांचेसह , महेंद्र कोल्हे सर , उज्वला बागुल , उपस्थित होते .


यावेळी ऍड निलेश भंडारी म्हणाले की , आजच्या आधुनिक जगात, अंमली पदार्थ म्हणजेच ड्रग्ज यांचे व्यसन समाजातील एक भयंकर संकट बनले आहे. फॅशन, दबाव, मित्रपरिवाराचा प्रभाव किंवा जिज्ञासा या कारणांमुळे अनेक युवक या दलदलीत ओढले जातात. परंतु याचे परिणाम अत्यंत भीषण असतात शारीरिक हानी, मानसिक अस्थिरता, आर्थिक नुकसान आणि शेवटी समाजातील व कायद्याच्या चौकटीत अडकलेले जीवन अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांमध्ये कायद्याची जाण व जागरूकता निर्माण करणे अत्यावश्यक असल्याचे सांगत अंमली पदार्थ म्हणजे काय, त्याचे प्रकार आणि परिणाम व्यसनाधीनतेपासून बचावाचे उपाय, समाज आणि कुटुंब यांची जबाबदारी. मदत मिळविण्यासाठी उपलब्ध संस्था आणि हेल्पलाईन क्रमांक बाबत माहिती दिली .

तर विधी सेवा समिती सदस्य उज्वला बागुल यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक करीत विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूरच राहा असे आवाहन करीत विधी सेवा समितीचे कार्य व पद्धती बाबत माहिती दिली .

प्रसंगी मुख्याध्यापक श्री वारके सर यांनी विद्यार्थ्यांना समयोचित मार्गदर्शन केले . तर जी जी नारखेडे सर यांनी सूत्रसंचलन व आभार मानले . यावेळी शिक्षिका सौ रेखा नारखेडे , आर डी महाजन , एन एस पाटील , एस टि कोळी , व्ही एस पाटील , उमराणी मॅडम राकेश ठाकरे , महेश महाजन , यांचेसह शिक्षक शिक्षकवृंद व शिक्षेकतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते . यशस्वीतेसाठी एस टी कोळी सर व श्रीकृष्ण हायस्कुल सहकारी यांनी सहकार्य केले .


