भुसावळ (प्रतिनिधी ) – राज्यात सर्वत्र नगरपरिषद,महानगर पालिका यांच्या निवडणुका घोषित झाल्या आहेत.सदर निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागते म्हणून काही माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापकांसह पटावरील सर्वच शिक्षकांना निवडणुकीच्या कामाबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत याअनुषंघाने येथील शिक्षकांच्या दर्जाचे योग्य ते भान ठेवूनच त्यांना निवडणुकीचे काम द्यावे अशी मागणी करणारे पत्र शिक्षकांचे जेष्ठ नेते तथा भा ज पा शिक्षक आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्र. ह.दलाल यांनी केली आहे .

माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापकांसह पटावरील सर्वच शिक्षकांना निवडणुकीच्या कामाबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत मग शाळा बंद ठेवायच्या का? मात्र शाळेला सुटी द्यायची की नाही याबाबत शिक्षण खात्याकडून काहीही आदेश नाही ह्या गोंधळामुळे मुख्याध्यापक मात्र संभ्रमात सापडले आहेत. महसूल व शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांचा आपसात कोणताच ताळमेळ न राहिल्याने ही विचित्र स्थिती उद्भवली आहे त्याचे निराकरण करावे तसेच शिक्षकांना निवडणुकीची कामे देतानाही त्यांच्या दर्जाचे भान ठेवले जात नाही वास्तविकता महसूल कडून प्रत्येक शाळेतील शिक्षकांची नावे मागवितानाच त्याचे पद,पगार,एकूण सेवा इ माहिती मागवली जाते तथापि ही माहिती दुर्लक्षित करून शाळेतील प्रयोग शाळा सहाय्यक केंद्र अध्यक्ष, किंवा मतदान अधिकारी 1 आणि वरिष्ठ शिक्षकास त्या खाली दुय्यम स्थानावर नियुकी दिली गेल्याची उदाहरणे गेल्यावेळी आढळून आली होती .हा शिक्षकांचा अपमान नाही का? त्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती हे लक्षात घेऊन ह्यावेळी तरी असे होऊ नये शिक्षकांच्या दर्जाचे योग्य ते भान ठेवूनच त्यांना निवडणुकीचे काम द्यावे अशी मागणी करणारे पत्र शिक्षकांचे जेष्ठ नेते तथा भा ज पा शिक्षक आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्र. ह.दलाल यांनी प्रसिद्धीला दिले आहे

1


