भुसावळात प्रथा परंपरेनुसार वेद मंत्रोच्चारात अत्यंत थाटामाटात तुलसी विवाह संपन्न,

भुसावळ( प्रतिनिधि ) – येथील विठ्ठल मंदिर वार्ड भागातील तेली गल्ली येथे महिला मंडळातर्फे वैकुंठ चतुर्दशीचे निमित्त साधून अनिल बबनराव बागुल यांचे निवास स्थानी तुलसी विवाह समारंभा आयोजन करण्यात आले होते वेद मंत्रा च्या उच्चारात शास्त्रोक्त पद्धतीने विधिवत व वैदिक पद्धतीने गोरजमुहूर्तावर तुलशी व श्रीकृष्ण भगवान यांचा थाटामाटात विवाह संपन्न झाला यावेळी परिसरातील नागरिक व महिलां साजश्रुंगारासह भरजरी पैठणी साड्या नेसून लग्नसोहळ्यात सहभागी झाले होते

कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील देवउठनी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच द्वादशी ते पौर्णिमा या दरम्यान तिथीला तुळशी विवाह संपन्न होतो. हिंदू धर्मामध्ये तुळशी विवाहाचे खूप महत्त्व असून शुभ मानले जाते. तुळस ही पवित्रता आणि सकारात्मक उर्जेचे प्रतीक आहे असेही मानले जाते. तुळशीचे रोप लावल्याने वातावरण शुद्ध होते आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहते.तुळशीविवाहा नंतर म्हणजेच दिवाळी संपल्या वर लग्नसराई सुरू होते

प्रसंगी बालगोपालांच्या हस्ते वर भगवान श्रीकृष्ण यांची सवाद्य वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली तर तुलसी मातेस वधुसाजशृंगार करून सजविण्यात आले होते . अंतरपाट धरून मंगलाष्टक सादर करण्यात आले विवाहसोहळ्यानंतर उपस्थित सर्व पाहुणे मंडळींसह नागरिकांनी सुरुची भोजनाचा आनंद घेतला . यावेळी पौरिहित्य नंदकुमार जोशी गुरुजी कुळकर्णी यांनी केले .

यावेळी अनिल बागुल , चंद्रकांत बागुल ,संतोष तळेले , सुभाष तळले , गजानन बोके , सुलेख ब-हाटे , प्रतीक राठोड, उज्वला बागुल , भारती कोळी , मंगला तळेले ,निर्मला कोळी , बेबी सोनवणे , मनीषा चौधरी , वैशाली कोळी , अलका कोळी , दिपाली बोके ,चंद्रकला बागुल , प्रतिभा विसपुते , मोहिनी चौधरी , कीर्ती चौधरी , जान्हवी बागुल ,सुरेखा चौधरी , शितल चौधरी , रेणुका चौधरी , आशा कोळी, तेजस्विनी बोके , लावण्या चौधरी , श्रद्धा , गुंजन , हंशीता , तनिष्का फेगडे, पूनम , रत्ना जाधव आजी , शांता तळेले आजी , नर्मदा कोळी , यांचेसह परिसरातील अबालवृद्ध नागरिकांची उपस्थिती होती.

विवाहसोहळ्यानंतर उपस्थित सर्व पाहुणे मंडळींसह नागरिकांनी सुरुची भोजनाचा आनंद घेतला व.विवाह सोहळ्याची सांगता झाली. विवाहसोहळा यशस्वीतेसाठी सर्व भाविकांचे व नागरिकांचे सहकार्य लाभले .