शासनाने नुकसानग्रस्त शेतकरी यांचे पिकपेरा नोंदणी बाबतचे ॲप व्यवस्थित करावं, किंवा तलाठी मार्फत पिक पाहणी नोंदणी करावी – शिवसेना ठाकरे पक्षाची मागणी

जळगांव (प्रतिनिधी ) – शासनाने नुकसानग्रस्त शेतकरी यांचे पिकपेरा नोंदणी बाबत ॲप व्यवस्थित करावं, किंवा तलाठी मार्फत पिक पाहणी नोंदणी करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे करण्यात आली असून सदर बाब जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे निदर्शनात आणून देत चर्चा केली.

जिल्हात किंवा अन्य जिल्ह्यांत १५,१६ आॅगस्टचा मध्य रात्री मुसळधार व ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले, या नुकसानग्रस्त शेतकरी यांना जर पिक पेरा लागला नाही परिणामी त्यांच्या शेतीची नोंद “पडीक जमीन” अशी केली जाते.सरकार ने एक तर ॲप व्यवस्थित करावं, नाही तर तलाठी मार्फत पिक पाहणी नोंदणी करावी अशी मागणी शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे जास्त पाऊस या कारणांमुळे शेतकऱ्यांचे पंचनामे होत आहे परंतु त्याला आपल्या शेतात कोणते पिक लावले आहे याचा पिक पेरा आवश्यक आहे.पहीले याची नोंद ७/१२ उताऱ्यावर करावी लागते. यालाच पिक पेरा म्हणतात. आधी हे काम तलाठी ऑफलाईन करायचे. पण गेल्या २-३ वर्षांपासून “डिजिटल इंडिया”च्या नावाखाली सरकारने पेरा भरण्याची प्रक्रिया मोबाईल अँपवर सुरू केली आहे. आणि हे ॲप कोणत्या तज्ञाने बनवले काय माहित ? अजिबात चालत नाही.त्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे,पण अधिकारी,शासन लक्ष द्यायला तयार नाही, म्हणून ऐरानीत एक म्हण आहे दुष्काळमा तेरावा महिना आणि कोणत्याही कार्यालयात जा ” साईड चालत नाही ” हेच उत्तर ऐकायला मिळते.
याहून मोठा प्रश्न म्हणजे,पिक पेरा भरल्याशिवाय शेतकऱ्याला पिकाच्या नुकसानीची भरपाई, पीकविमा किंवा कोणतीही सरकारी मदत मिळत नाही. त्यामुळे कित्येक शेतकरी अडाणीपणामुळे, मोबाईल वापरता न आल्यामुळे किंवा अँपच्या त्रुटीमुळे पिक पेरा लावू शकत नाहीत. हि अडचण जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना लक्षात आणून दिली,

यावेळी शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली उ कुलभूषण पाटील ,जिल्हा प्रमुख जळगांव लोकसभा.
दिपक राजपूत, जिल्हा प्रमुख रावेर लोकसभा यांचेसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते .