भुसावळ (प्रतिनिधी ) – नुकताच पावसाळा सुरू झालेला असून शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केलेली मात्र ऐन पावसाळ्यात भुसावळ सह जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रासायनिक खते मिळत नसल्याने शेतकरी आता मोठ्या संकटात सापडलेले आहे . रासायनिक खते मिळत नसल्या कारणामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे
कृषी केंद्रावरती शेतकरी खत मिळण्याकरता धडपड करत आहे परंतु केंद्र चालकांकडून असे समजले जाते कंपनीकडूनच खतांचा पुरवठा होत नाही आहे कंपनीने खताचा सप्लाय बंद करून टाकला आहे केंद्र चालकांना कोरोमंडल कडून काहीच प्रतिसाद मिळत नाही जिल्हाकृषी विभाग झोपलेला आहे का? जर शेतकऱ्यांना वेळेवरती पिकांना खत दिले गेले नाही तर शेती उत्पन्न घटेल ,शेतकरी आला मोठ्या नुकसानीला सामना करावा लागेल. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ सह विविध तालुक्यातील कृषी अधिकारी याच्याकडे खतांचा तपासणी औषधांची तपासणी हा विषय असतो मात्र ते फिरतच नसल्याचा आरोप शिशिर जावळे यांनी केलेला आहे .तसेच
याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात विचारणा केली असता जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे खतांसाठी बंप साठा उपलब्ध असून ते 16 जुलै 2025 नंतर वितरण करण्यात येणार असल्याचे सांगितले मात्र तो साठा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना पुरणार नाही मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने खतांच्या कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात खत उपलब्ध करून द्यावे अन्यथा या विरुद्ध आंदोलन करणार असल्याचे भाजपा ओबीसी मोर्चा चे प्रदेश सचिव शिशिर जावळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकांद्वारे कळविलेले आहे.



