भुसावळ ( प्रतिनिधी ) – -. नुकतच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका येऊ घातलेल्या आहे. गेल्या काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमधील ओबीसी आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ठ होता तूर्तास सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण निर्णय जैसे थे ठेवल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि अशातच निवडणूक आयोगाने राज्य सरकारला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचनेबाबत आदेश जारी केलेले आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्ष संघटना जोमाने कामाला लागलेले आहेत. त्यामुळे यंदाची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या अतिशय ऐतिहासिक होणार असून चुरशीच्या होणार असून यामध्ये विविध राजकीय पक्ष आपल्या वेगवेगळ्या डावपेच करून सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्न करतील. या निवडणुकांमध्ये ओबीसी मराठा समाज आरक्षण वगैरे मुद्द्यांसह स्थानिकविविध प्रश्न सुद्धा गाजणार आहेत. या निवडणुकांमध्ये सामाजिक समीकरण या निवडणुकांचे भवितव्य ठरवतील. जळगाव जिल्ह्यातील बहुसंख्य असलेला लेवा पाटीदार समाजाचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ते संपुष्टात येऊ नये म्हणून आणि समाजाचे जास्तीत जास्त प्रतिनिधी या निवडणुकांमध्ये निवडून यावेत नवख्यांना आणि काही अनुभवींना संधी मिळावी. आणि समाजामध्ये राजकीय नेतृत्व बळकट व्हावं तसेच राजकारणातील लेवा समाजाच्या प्रतिनिधींची टक्केवारी वाढावी याकरिता लेवाहितवादी चळवळीतर्फे लेवा समाजातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2025 साठी इच्छुक असणाऱ्या समाजातील सर्वच युवक बंधू-भगिनीं यांच्यासाठी लवकरच मुलाखतींचे आयोजन करण्यात येणार असून मुलाखतीनंतर सक्षम सुशिक्षित निगर्वी निस्वार्थी कृतिशील आणि उपक्रमशील असणाऱ्या इच्छुक उमेदवाराची माहिती संबंधित राजकीय पक्षांना कळविण्यात येणार असल्याची माहिती लेवा हितवादी चळवळीचे संस्थापक लेवा समाजाचे युवा नेतृत्व शिशिर जावळे आणि लेवा हितवादी चळवळीचे कार्याध्यक्ष माजी कृषी अधिकारी दिलीप चौधरी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविलेले आहे. सातत्याने राजकीय क्षेत्रामध्ये विविध निवडणुकांमध्ये उमेदवारी तसेच विविध पद देताना बऱ्याच ठिकाणी समाजावर अन्याय होत असुन समाजाचा राजकीय अस्तित्व संपुष्टात आणण्यासाठी काही ठिकाणी प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप सुद्धा जावळे यांनी केलेला आहे .



