नवी दिल्ली,

पाकिस्तानकडून दिल्लीवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र हरियाणातल्या सिरसामध्येच पाकिस्तानचे क्षेपणास्त्र पाडण्यात आले. पहाटेपासून भारत-पाकमध्ये जोरदार हवाई हल्ले सुरू आहे. पाकिस्तानकडून भारतावर क्षेपणास्त्र हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. फतेह 1 क्षेपणास्त्रद्वारे (Fattah-1) पाकने भारतावर हल्ला केला. पाकिस्तानकडून भारताच्या अनेक हवाई तळांवर हल्ले करण्यात आले. जम्मू एअर बेस, उधमपूर एअर बेस, पठाणकोट एअर बेस, श्रीनगर एअर बेस, बियास एअर बेसवर पाककडून हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
26 शहरांना लक्ष्य
शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. शुक्रवारी रात्री पाकिस्तानने गुजरात, जम्मू आणि काश्मीर, राजस्थान आणि पंजाब या 4 राज्यांमधील 26 शहरांवर ड्रोन हल्ले केले. श्रीनगर विमानतळावरही हल्ला झाला. उत्तरेत जम्मूमधील बारामुल्ला ते पश्चिमेत गुजरातमध्ये भुज दरम्यान पाकिस्तानने 26 शहरांना लक्ष्य केलं. नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले करत पाकिस्तानने भारतीय लष्कराला डिवचण्याचं काम केलं. मात्र काही वेळातच भारतीय लष्कराने पाकला जशास तसं उत्तर दिलं. पाकिस्तानमधील महत्त्वाच्या शहरांमध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर आली.


