वरणगाव (वा ) –

वरणगाव सैन्यदलाचा जवान अर्जून बावस्कर यांना दि २४ सोमवार रोजी भारत चीन सीमेवर अरुणाचल प्रदेशातील दुर्गम भागात लेखपाली येथे कर्तव्य बजावीत असताना विरमरण आले होते . दि २७ गुरुवार रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दुपारी दोनला शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. हजारो शोकाकुलानी विर जवान अमर रहे घोषणा देत अखेरचा निरोप दिला यावेळी त्यांच्या दोघ मूलानी अग्नी डाग दिला .
सिध्देश्वर नगर परिसरातील सम्राट नगर मधील व भारतीय सैन्य दलातील जवान अर्जून लक्ष्मण बावस्कर (३५) यांना अरुणाचल प्रदेशातील लेखपाली येथे कर्तव्यावर विरमरण आले होते. लष्करी प्रक्रिया पुर्ण झाल्या नंतर त्यांचे पार्थीवदेह छत्रपती संभाजी नगर येथुन दि २७ गुरुवार रोजी सकाळी लष्करी वाहणाने घरी आणण्यात आले होते. तेव्हा त्यांच्या अंत्यदर्शना साठी परिसरातील पंचक्रोशीत नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तर त्यानंतर त्यांच्या अंतिमयात्रेसाठी हार व फुलानी सजविण्यात आलेल्या वाहनात तिरंग्यात चिरनिद्रेत ठेवून अंत्ययात्रा निघाली होती.
सिध्देश्वर नगर , वामन नगर , बस स्थानक चौक , प्रतिभा नगर मार्गे जात असताना विर जवान अमर रहे , भारत माता अशा घोषणा दिल्या जात होत्या यावेळी बस स्थानक चौकातील तिरंगा ध्वजा जवळ मानवंदना देण्यात आली . अंत्ययात्रेच्या समोर महत्मा गांधी विद्यालयाच्या एन एन सीच्या विद्यार्थ्यानी शंभर फुटी कापडी तिरंगा ध्वज धरून सहभागी झाले होते. तर रस्त्यावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या व अंत्ययात्रेत नागरिक पुष्पवृष्ठी करीत होते.
उप कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अतिम यांत्रा पोहचल्या नंतर विर जवनाला लष्कर , पोलीस प्रशासन , जिल्हा प्रशासन , विविध राजकिय पक्ष , सामाजिक संघटना , नगर परिषद प्रशासन ,माजी नगर सेवेक , पंचक्रोशीतील माजी सैनिक व नागरिकांनी पुष्पचक्र अपर्ण करीत श्रद्धांजली वाहिल्या नंतर लष्करी जवानांनी व पोलीस प्रशासनाने हवेत फैरी झाडून मानवंदना दिल्या नंतर त्यांच्या पार्थीव देहावर शासकीय अंतिम संस्कार करताना त्यांच्या दोघ मुल विवेक व वश यांनी अग्नी डाग दिला.
मन हेलवीणारा आक्रोश
गेल्या चार दिवसा पुर्वी अर्जूनच्या विरमरणाची बातमी कुटुंबीयांना कळताच डोळ्यातील अश्रू थाबतच नव्हते मात्र प्रत्येक्षात त्यांचे पार्थीव देह समोर येताच
पत्नी ,नंदा आई रमाबाई , वडील लक्ष्मण , मुले विवेक ‘ व वंश यांचा आक्रोश मनसुन्न करणार होता.
लोकप्रतिनिधीची व प्रशासकीय अधिकाऱ्याची उपस्थिती
जवानाच्या अत्यदर्शन व अंत्ययात्रेसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील , जलसंपदा मंत्री गिरीष महाजन , माजी महसुल मंत्री आ एकनाथ खडसे , उप विभागीय अधिकारी जितेंद्र पाटील , तहसिलदार निता लबडे , मुख्याधिकारी सचिन राऊत , सह पोलीस निरिक्षक जनार्धन खडेराव यांची उपस्थिती होती.
शहीद स्मारकाची मागणी
अर्जुन बावस्कर यांच्या स्मरणार्थ शहरात स्मारक उभारण्याची मागणी यावेळी करण्यात आली तर त्यांच्या कुटूंबाला शासना कडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ना. महाजन यांच्या डोक्याला दुखपत
अंतिम यात्रा रस्त्याने जात असताना ना गिरिष महाजन हे त्या ठिकाणी पोहचत जवानाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी वाहनात चढत असताना त्यांच्या डोक्याला मार लागल्याने रक्त स्त्राव होत असताना देखील त्यांनी अत्यंदर्शन घेऊन कुटूबीयाची भेट घेऊन सात्वन केले. नंतर त्यांना तात्काळ एका खासगी रुग्णालयात उपचार केल्या नंतर पुढील कार्यक्रमास रवाना झाले.
तर उन्हाच्या तीव्रतेमुळे अंत्यसंस्कारा साठी आलेल्या दोन महिलाना उष्पघाताचा फटका बसल्याने भोवळ येऊन खाली पडल्या होत्या .त्यांनाही खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.



