भुसावळ – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ येथे राज्यशास्त्र विभागा अंतर्गत संविधान गौरव महोत्सव हा कार्यक्रम साजरा झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा. डी. एन. पाटील हे होते. यावेळी व्यासपीठावर राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर. एस. नाडेकर, तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉ. एस.के. राजपूत, प्रा.श्रीपाद वाणी, प्रा.बी.के. बाणाईत हे उपस्थित होते. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचे सामूहिक वाचन करण्यात आले.
अध्यक्ष प्रा.डी. एन. पाटील यांनी सरनाम्याच्या मूल्यांवर प्रकाश टाकला. त्यांनी व्यक्तीला मिळालेले हक्क व अधिकार कसे महत्त्वाचे आहे हे स्पष्ट केले.
डॉ. आर. एस. नाडेकर यांनी “संविधानातील मूलभूत हक्क” या विषयावर आपले व्याख्यान दिले. विद्यार्थ्यांना भारतीय नागरिक म्हणून आपल्या जबाबदारीची भावना अंगी बाळगणे महत्त्वाचे आहे. नागरिकांचे मूलभूत कर्तव्य व मूलभूत हक्क सहसंबंध स्पष्ट केला. समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क यांसारख्या मूलभूत हक्कांवर प्रकाश टाकला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुच्छेद 32 ला घटनेचा आत्मा म्हणतात. त्या मागची प्रमुख भूमिका स्पष्ट केली.
विद्यार्थ्यांनी पोस्टर तयार करून आणले. तसेच निबंध स्पर्धेचे आयोजन करून त्यातील प्रथम व द्वितीय निबंध महाविद्यालयाच्या तरंग मासिकात प्रकाशित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील, उपप्राचार्य प्रा.डॉ.बी.एच.ब-हाटे, उपप्राचार्य प्रा.डी.एन. पाटील यांनी अनमोल सहकार्य केले.
कला व विज्ञान शाखेचे विद्यार्थी, विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रा. डॉ. राजपूत सरांनी केले.



