मराठी( उच्च स्तर) विषयाच्या प्रश्पत्रिकेत लेखन नियमांबाबत स्वतःच असंख्य q केल्या – प्र. ह ,दलाल यांचा आरोप ;

भुसावळ (प्रतिनिधी )- , दि.२१ रोजी झालेल्या मराठी( उच्च स्तर) विषयाच्या प्रश्पत्रिकेत परीक्षा मंडळाने काढलेल्या व विद्यार्थ्यांना लेखन नियमांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या असे सुचनेत सांगणाऱ्या परीक्षा मंडळाने च प्रश्पत्रिकेत लेखन नियमांबाबत स्वतःच असंख्य चुका केलेल्या आहेत.विशेष म्हणजे सदोष प्रश्नपत्रिका ह्याच वर्षी निघाली असेही नाही गेल्या सुमारे पंधरा वर्षांपासून हेच नियमितपणे सुरू आहे दरवर्षी याबाबत त्वरित वृत्तपत्रात लेख/ बातमी प्रसिद्ध होऊन देखील यात काहीही बदल होत नाही ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे जनतेच्या पैशातून स्वतः लाखावर दरमहा वेतन घेणाऱ्या, मंडळांवर डझनावारी तथाकथित तज्ज्ञ व्यक्तींच्या नियुक्ती करून त्यांच्या मानधन, विविध भत्ते यासाठी अक्षरशः लाखो रुपये उधळणाऱ्या अधिकाऱ्यांना बेजबाबदार ,अकार्यक्षम याशिवाय अन्य विशेष ण नाहीच.
शासनाच्या मराठी भाषा विभागाने दिनांक सहा नोव्हेंबर 2009 रोजी मराठी भाषेतील लेखन दो ष दोष दूर करण्यासाठी नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीच्या शिफारशी स्वीकारून त्याप्रमाणे लेखन करावे असा आदेश काढला. त्यानंतर पुन्हा दिनांक 10 नोव्हेंबर 2022 रोजी पुन्हा एक स्पष्ट व सविस्तर आदेश काढून सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय पाठ्यपुस्तक मंडळ यांना या लेखन नियमानुसार लेखन करावे असे आदेशित केलेले आहे याशिवाय अगदी अलीकडे म्हणजे दिनांक सहा जानेवारी 2025 रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त काढलेल्या शासनाच्या परिपत्रकात आणि तीन फेब्रुवारी 2025 रोजी मराठी भाषेच्या धोरणाची अंमलबजावणी करण्याबाबत काढलेल्या परिपत्रकालाही शासनाच्याच अखत्यारीत असणाऱ्या पाठ्यपुस्तक मंडळाने व परीक्षा मंडळाने अक्षरशः तिलांजली दिली आहे
या वर्षाच्या मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत पुढील काही गंभीर चुका झालेले आहेत
(१) शासनाच्या दिनांक दहा नोव्हेंबर 2022 च्या आदेशानुसार अंक लेखन करताना इंग्रजी अंक न वापरता, १,२,४ असे मराठी अंक लिहावे अशी स्पष्ट सूचना असताना सदर प्रश्नपत्रिका मात्र सर्वत्र, 1,2,4,.. असे इंग्रजी अंक सर्रास वापरलेले आहेत. (२) उपरोक्त शासन आदेशानुसार श,आणि ल ही अक्षर वळणे चुकीची आहेत (३) सदर प्रश्नपत्रिकेत, दविगु, जिद दी, प्रसीदध, दवार, याप्रमाणे तोडा क्षर पद्धती वापरली असून नियमानुसार ते शब्द द्विगु,द्वंद्व, द्वार,पद्धती,प्रसिद्ध,जिद्द असे असायला हवे(४) द हे व्यंजन जोडाक्षरात आधी आल्यास व त्यापुढे “य” आल्यास, दय असे न लिहिता द्य,असे लेखन करावे हा नियम झुगारून सर्वत्र विं द य, गद् य, दया वे, विद्ापीठ असे नियमबाह्य लेखन केले आहे (५) सुरुवातीलाच सूचना क्रमांक पाच मध्ये लेखन नियमांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे हे संपूर्ण वाक्यच मुळात लेखन नियमानुसार नाही. लोका सांगे ब्रह्मज्ञान,…. असेच नाही का? अचूक शब्द ओळखा.यात ( vi,v, 2 यात लेखन नियमानुसार एकही शब्द अचूक नाही सर्व चुकीचे आहेत
थोडक्यात म्हणजे,
कोणी निंदा, कोणी वंदा,
नियमित सदोष प्रश्नपत्रिका काढणे,
हाच आमचा वसा!
नियम वाचणार नाही,
कोणाचेही ऐकणार नाही,
घेतला वसा टाकणार नाही!
अशा शिक्षण खात्याच्या नशिबी लाभलेल्या कनिष्ठापासून सर्वोच्च उदासीन बेजबाबदार अधिकाऱ्यांना त्रिवार वंदन करणे व आलिया भोगासी… याशिवाय करणार तरी काय? असा उद्विग्न प्रश्नही प्र. ह.दलाल यांनी विचारला आहे.