महिला पर्यावरण मंच भुसावळ
ची धूप बनवण्याची कार्यशाळा तसेच वर्धापन दिन संपन्न…
भुसावळ (प्रतिनिधी ) – महिला पर्यावरण मंच भुसावळचा वर्धापन दिन गजानन महाराज प्रकट दिनाच्या दिवशी असतो त्यानिमित्ताने सालाबादप्रमाणे यंदा मंचने सुरू केलेल्या प्लेट बँकेच्यावतीने सर्व पर्यावरण सख्यांना पर्यावरणाच्या प्लेट बँकेच्या ताटामध्ये पिठलं, पोळी, भाकरी,ठेचा जिलेबी अशा सुग्रास भोजनाची व्यवस्था दत्त मंदिर यावल रोड भुसावळ येथे करण्यात आली..
पर्यावरण म्हटले म्हणजे पर्यावरण पूरक ऍक्टिव्हिटी ही झालीच पाहिजे असा अध्यक्षा शालिनी वाडेकर यांचा प्रयत्न असतो याअनुषंगाने दत्त मंदिर येथे धूप उदबत्ती तील निर्माल्य म्हणजेच पूजेची फुलं सुकवून वाळवून त्याची पावडर करून, त्यामध्ये गुलाब जल, गावराणी तूप,मध, कोळसा , शेणाची गोवरी, तेजपान लवंग कापूर यांची पावडर करून सुंदर अशी सुगंधी धूप सर्व पर्यावरण मैत्रिणींनी तयार केली. धूप बनवण्याच्या यावं कार्यशाळेमध्ये शालिनी वाढेकर, वैशाली सैतवाल , मंजू सुरळकर , पूजा मेहता, भारती फडणीस, सोनाली राणे सुनंदा औंधकर अशा कार्यकारणी सख्यांनी विशेष मेहनत घेतली .
कार्यशाळेसाठी जयश्री इंगळे, सुनंदा भारुडे, वंदना बाविस्कर, उषा काथार, हेमांगी सूर्यवंशी, मंदा धांडे, रंजना वराडे, उमा बारस्कर, शुभांगी चौधरी, माधुरी चौधरी, तेजल चौधरी, वंदना मालविया, स्वाती भावसार, विद्या बडगुजर, मंजू शर्मा, अंजली उघडे, ज्योती श्रीवास्तव, प्रतिभा गायकवाड तसेच पर्यावरण सखी रेवा फडणीस इत्यादी पर्यावरण सख्या उपस्थित होत्या..

घरगुती पूजेची फुलं नदीत फेकून आपण एकप्रकारे नदीच्या पाण्याचे प्रदूषण करीत असतो त्यावर पर्याय म्हणून निर्माल्यापासून सुगंधी धूप बनवता येते असा संदेश अध्यक्ष शालिनी वाढेकर यांनी यावेळी सर्व शहरवासीयांना दिला आहे.


