निंभोरा:- भुसावळ तालुक्यातील निंभोरा बृद्रुक येथील त्रिरत्न बुद्ध विहारात दि.०८/०२/२०२५ शनिवारी रोजी रमेश खंडारे यांच्या अध्यक्षते खाली बैठक संपन्न झाली.
या बैठकीत सर्व प्रथम वरणगाव येथील माता रमाई जयांतीत समाज कंटकानी केलेल्या दगड फेकीचा निषेध करण्यात आला.
सोमवारी याबाबत प्रांत अधिकारी , भुसावळ यांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची कार्यकारणी ची निवड करण्यात आली ती पुढील प्रमाणे अध्यक्ष मनिष सुरवाडे, उपाध्यक्ष दीनेश साळवे,सचिव किरण हतोले,कोषाध्यक्ष विशाल जोहरे, सहकोष्याध्यक्ष प्रणव मेश्राम, संघटक अजय वाघ,सहसंघतक गौरव नरवाडे, प्रसिध्दी प्रमुख सोरवकुमार सरदार
नियोजेन समितीत विकास खंडारे, विद्यानंद मेश्राम, तुषार बाऱ्हे, सुमेध कांबळे, आशिष सुरवाडे, सागर नाईक, तरुण गवई, सुमेध चतुर, चंदा खंडारे, उषा सुरवाडे, वनमाला हिवाळे, जिजाबाई सोनवणे, वैशाली जाधव, प्रज्ञा खंडारे , लीला चतुर या प्रमाणे कार्यकारणी सर्वानुमते निवडण्यात आली.
यावेळी प्रकाश सरदार, एन. टी. इंगळे, रमेश बोदडे, अरुण भालेराव,जयवांताबई इंगळे, मिरा नरवाडे, प्रज्ञा मेश्राम, रत्ना नाईक, तेजमाला जमदाडे, बनाबई इंगळे,इत्यादी सह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. असे प्रसिध्दी प्रमुख सौरवकूमार सरदार यांनी कळविले आहे.



