भुसावळ -भुसावळ तालुक्यातील कुर्हा पानांचे येथे भुसावळ तालुका महिला समितीने वनवासी कल्याण आश्रम स्थापना दिवस साजरा केला .

प्रसंगी भारतमाता व वनयोगी बाळासाहेब देशपांडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी उपस्थित महिला व पुरुषांना कल्याण आश्रमाची स्थापना कशी आणि का करावी लागली याविषयी माहिती ॲड जास्वंदी भंडारी यांनी दिली, तर ॲड जयश्रीताई देशमुख यांनी संघटीत रहा आपल्या रुढी परंपरा धर्म यांचे जतन करा असे सोप्या शब्दात समजावुन सांगीतले
ॲड मंजुषा कुलकर्णी यांनी महिला कार्याची माहिती देवुन शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले यावेळी प्रतिमा अग्रवाल व नीता बारी यांनीही सहकार्य केले.


