भुसावळ प्रजिनिधी )दिनांक 3 जानेवारी २०२५) – येथील गुरु चंद्रमणी बुद्ध विहारात सावित्रीच्या लेकी गृपच्यावतीने आज दिनांक ३ जानेवारी २०२५ रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली . कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून पत्रकार उज्वला ताई बागुल तर प्रमुख वक्ते म्हणून अडव्होकेट जास्वंदी भंडारी या उपस्थित होत्या.कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून भगवान गौतम बुद्ध यांचे पुजन तसेच सावित्रीबाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


स्त्रियांनी सावित्रीबाई फुले यांचा आदर्श व प्रेरणा घेऊन कार्य करावे – जास्वंदी भंडारी
यावेळी अँडव्होकेट जास्वंदी भंडारी यांनी आपले विचार मांडताना आजच्या स्त्री ने मुली व महिलांसाठी झिजणार्या सावित्री माऊलींचे ॠण फेडायचे असतील तर खरं एकमेकींना साथ देत महिलां सक्षमीकरण,सबलीकरण या साठीच कार्य केले तर ही खरी जयंती साजरी होईल. असे म्हणत महिला ही कशी असली पाहिजे, समाजासाठी तिचे योगदान काय असले पाहिजे? आजच्या स्त्रियांनी चूल आणि मूल यातच गुंतून न राहता आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून महिलांनी घराबाहेर पडायला पाहिजे व सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून व त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन कार्य करायला पाहिजे असे आपले मनोगत व्यक्त केले.

महिलांनी आत्मनिर्भर व स्वावलंबी व्हावे – उज्वला बागुल
तसेच पत्रकार उज्वला बागुल यांनी सावित्रीबाई फुले या कशा घडल्या ज्योतिराव फुले यांनी त्यांना कसे सहकार्य केले न डगमगता ध्येय गाठले . शिक्षणामुळेच आज सर्व क्षेत्रात महिलांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे महिला खऱ्या अर्थाने शिक्षणाने प्रगत व पगल्भ झाली त्याचप्रमाणे तिने आत्मनिर्भर व स्वावलंबी व्हावे सावित्रीमाई सारखे आचार व विचार अवगत करून आचरणात आणावे याविषयी आपले विचार व्यक्त केले.
त्यानंतर वर्षा ठाकरे, शीला गुरचळ, अनिता सोनवणे,सुश्मिता कोल्हेकर , शुभांगी वानखेडे, शोभा तायडे, पोर्णिमा केदारे, मनीषा तायडे, निशा चौधरी, अनिता तायडे, गंगा सावळे, अलका सपकाळे, मंदाकिनी केदारे, रितिका सोनवणे , महिला पोलीस जळगाव गीता कश्यप , यांनी सावित्रीबाई फुले यांच्या विषयी उत्स्फूर्तपणे मनोगतातुन कार्यची माहिती दिली तसेच कविता सादर केल्या .
तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने सावित्रीच्या लेकी यांनी आज एक नवा संकल्प हाती घेतला. कार्यक्रमासाठी येणाऱ्या प्रत्येक महिलेने सोबत एक वही व पेन सोबत आणावे या वह्यासह शैक्षणिक साहित्याचे संकलन करून ते गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना वाटप केले जाईल..
यावेळी विद्यार्थिनी तेजस्विनी केदारे व सीमा तायडे अनिता तायडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित सुरेल गीत सादर केले.यावेळी पो.कॉ.ज्योती कश्यप उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया मेढे यांनी केले तर आभार प्रदर्शन सीमा तायडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सावित्रीच्या लेकी ग्रुप यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास परिसरातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .


