भुसावळात अतिक्रमित टपर्‍यांवर पालिकेची कारवाई : व्यावसायीकांमध्ये खळबळ –

भुसावळ : शहरातील वाहतुकीच्या रस्त्यावर अडचण ठरणार्‍या टपर्‍या, हातगाड्या हटविण्याची मोहिम पालिकेतर्फे राबवली जात आहे. शुक्रवारी पालिकेच्या पथकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील डीएस हायस्कूलजवळील टपर्‍या, हातगाड्यावर कारवाई केली, अतिक्रमण केलेल्या टपर्‍या, हातगाड्यावर पालिकेची संक्रांत आली. यात पथकाने 1 टपरीसह एक हातगाडी जप्त केली. अन्य व्यावसायीकांनी त्याच्या टपर्‍या काढून घरचा मार्ग धरला. पालिकेच्या या माोहिमीमुळे अतिक्रमण धारक टपरी व्यावसायीकांमध्ये एकच खळबळ उडाली.
शहरात वाहतूकीच्या रस्त्यावर अतिक्रमण करून व्यावसाय करीत असलेले अतिक्रमणधारक हे पालिकेच्या रडारवर आले आहे. शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील डीएस हायस्कूलच्या भिंतीलगत असलेल्या टपर्‍या, हातगाड्या यांना काढण्याच्या सूचना केल्या होत्या. यावेळी 9 टपरीधारकांनी त्यांच्या टपर्‍या वेळ मागून काढून घेतल्या तर एक टपरी चालक व हातगाडी चालक हे काढायला नाही, म्हणत असल्याने पालिकेच्या पथकाने टपरी व हातगाडी जप्त करून पालिकेत घेऊन गेले.

अन्य व्यावसायीकांनी मात्र, त्याच्या टपर्‍या काढून घेत, त्यांचे होणारे नुकसान टाळून घेतले. यावेळी पालिकेचे उपमुख्याधिकारी परवेज शेख, आस्थापना प्रमुख वैभव पवार, प्रशासकीय अधिकारी अजीत भट, अनिलकुमार आहुजा, अग्निशमन केद्र प्रमुख विवेक माकोडे, पाणी पुरवठा अभियंता सतीशश देशमुख यांच्यासह पालिकेचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
पालिकेच्या माध्यमातून शहरातील वाहतूकीच्या रस्त्यावर अतिक्रमण करून व्यावसाय करणारे व्यावसायीक पालिकेच्या रडारवर आहे. यामुळे अतिक्रमण हटाव पथकाकडून शहरात दररोज वाहतूकीला अडचण ठरणार्‍या टपर्‍या हटविणार असून नियमितत कारवाई होणार आहे जे टपरीधारक पालिकेच्या अधिकार्‍याच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतील त्याच्या टपर्‍या जप्त केल्या जाणार आहे. पालिकेचे कर्मचारी कारवाई करतात मात्र कारवाईनंतर अवघ्या 48 तासात पुन्हा त्या टपर्‍या पूर्वत्व होत असतात. त्यामुळे कारवाई करून फक्त 24 तासासाठी दिलासा मिळत असतो. नंतर मात्र, पुन्हा हटविलेल्या टपर्‍या या त्याच्या जागेवर असतात, त्यामुळे पालिकेची कारवाई ही अवघ्या 24 तासांसाठी दिसून येते.