भुसावळ — शेतात कोळपणीचे काम सुरू असतांना गवताच्या झुडपात दडून बसलेल्या घोणस जातीच्या विषारी सर्पाने शेतकऱ्याच्या पायास चावा घेतला . हि बाब लक्षात येताच शेतकऱ्याने यावल येथील ग्रामीण रुग्णालय गाठले . तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला . त्यानुसार नातेवाईकांनी त्यांना घेवून जळगांव गाठण्याचा प्रयत्न केला . मात्र, भुसावळच्या तापीनदी पुलावर त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना तातडीने भुसावळातील डॉ . राजेश मानवतकर यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले . यावेळी डॉ . मानवतकर यांनी शर्थीचे प्रयत्न केल्याने शेतकऱ्याला जिवदान मिळाले .

याबाबत माहिती अशी की यावल येथील शेतकरी समाधान वसंत वाघ ( वय – ४२ ) हे नेहमी प्रमाणे यावल पासून दोन किलोमिटर अंतरावर असलेल्या शेतात एका सहकाऱ्यासह पिक कोळपणीच्या कामासाठी गेले होते . मात्र, सकाळी ९ वाजेच्या दरम्यान कोळपणीचे काम सुरू असतांना गवताच्या झुडपात दडुन बसलेल्या तिन ते साडेतीन फुट लांबीच्या घोणस जातीच्या विषारी सर्पाने त्यांच्या डाव्या पायास कडाडून चावा घेतला . हि बाब लक्षात येताच समाधान वाघ यांनी सहकाऱ्याच्या मदतीने एक किलोमिटर अंतरावरील यावल ग्रामीण रुग्णालय गाठले . यावेळी त्यांच्या कुटुंबीयांना सर्पदंश झाल्याची माहिती देण्यात आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली होती . तर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचेवर प्राथमिक उपचार करून तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला . त्यानुसार कुटुंबीयांनी समाधान वाघ यांना भुसावळ मार्गे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना भुसावळ नजिकच्या तापीनदी पुलावर त्यांची प्रकृती चिंताजनक होवून त्यांचा श्वास बंद पडला होता . यामुळे भांबावलेल्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने भुसावळातील डॉ . राजेश मानवतकर यांच्या रुग्णालयात दाखल केले . यावेळी डॉ . मानवतकर यांनी क्षणाचाही विलंब न करता वाघ यांचेवर अति दक्षता विभागात उपचार सुरू केले . यामुळे सात दिवसाच्या उपचारानंतर समाधान वाघ यांची प्रकृती ठणठणीत झाल्याने डॉ . मानवतकर यांच्या शर्थीच्या प्रयत्नामुळे एक प्रकारे जिवदान मिळाल्याने वाघ परिवारामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे .
ओळख पटवण्यासाठी सर्पाला पाठवले यमसदनी
सर्पाने दंश केल्याचे निदर्शनास येताच समाधान वाघ त्यांच्या सहकाऱ्याने सर्प विषारी कि बिनविषारी हे डॉक्टरांना माहिती होवून उपचार करणे सोयीचे व्हावे यासाठी पळून जाण्याच्या बेतात असलेल्या अत्यंत विषारी घोणस जातीच्या सर्पाला यमसदनी पाठवले . व त्याचे छायाचित्र मोबाईल मध्ये काढून डॉक्टरांना दाखवण्यात आल्याने ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबीयांना रुग्णाला तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला होता .
असंख्य रुग्णांना जिवदान
रुग्णाला अत्यंत विषारी सर्पाने दंश केल्याने रुग्णाचा श्वास बंद पडला होता . हि गंभीर परिस्थिती पाहून रुग्णाचा श्वास सुरू करण्यासाठी ऑक्सीजन, व्हेंटीलेटर व औषधोपचाराने रक्तात पसरलेल्या विषाचा प्रभाव करण्यासाठी एएसव्ही इंजेक्शनचा वापर करण्यात आला . आणि अतिशय गंभीर अशा परिस्थितीतुन रुग्णाला जिवनदान देण्यास यश आले .आतापर्यंत सर्पदंश झालेल्या असंख्य रुग्णांवर उपचार केल्याने त्यांना जिवदान मिळाले आहे .
— डॉ . राजेश मानवतकर, भुसावळ


