नेपाळमध्ये बस अपघात : भूस्खलन प्रवण क्षेत्र ; जिल्हाधिकार्‍यांनी दिला होता सावधगिरीचा इशारा –

भुसावळ – शुक्रवारी सकाळी दुर्घटना झाली तो नेपाळमधील तनहु जिल्हा भूस्खलन प्रवण क्षेत्रात येतो. त्याच्या एकूण 85 वॉर्डापैकी 48 वॉर्ड भूस्खलन जोखीम क्षेत्रामध्ये येतात. त्यामुळे मुख्य जिल्हा अधिकारी जनार्दन गौतम यांनी पावसाळा सुरू होताच जून महिन्यात ट्रॅफिक अलर्ट जारी केला. विशेषत: पावसाळ्यात बाहेरून या भागात येणार्‍या प्रवाशांनी सावधगिरी बाळगावी, असे सूचित केले होते.

12 जुलैलाही झाला मोठा अपघात
अपघात झाला ते ठिकाण भूस्खलन, पूर, वीज पडणे आणि वादळ यासारख्या उच्च जोखमीच्या क्षेत्रात मोडते. गेल्या महिन्यात नेपाळमध्ये दोन बसेस त्रिशूल नदीत पडल्या होत्या. 12 जुलैला नेपाळमध्ये आणखी एक मोठा बस अपघात झाला होता. 12 जुलै रोजी मुसळधार पावसामुळे महामार्गावर दरड कोसळल्याने दोन बस त्रिशूल नदीत पडल्या. त्यात 63 जण होते. पैकी चालकासह 8 जण दगावले होते तर 50 हून अधिक लोक बेपत्ता झाले होते. मध्य नेपाळमधील मदन-आश्रित महामार्गावर हा अपघात झाल होता.