नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांनी साजरी केली गुरुपौर्णिमा :

भुसावळ – प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सर्वप्रथम आई-वडील हे गुरुचे काम करतात त्यानंतर शिक्षक हा जीवनाला आकार देतो आणि जीवनाला अर्थ निर्माण होतो अशी भावना नाहाटा महाविद्यालयातील १९९५ साली शिकलेल्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन गुरुपौर्णिमा साजरी केली..
प्रा.डॉ.ए.डी.गोस्वामी सेवानिवृत्त झाल्याने विद्यार्थ्यांनी शाल श्रीफळ आणि बुके देऊन त्यांचा सत्कार केला आणि आपल्या १९९५ साली शिकत असलेल्या अनुभवांना वाट मोकळी करून दिली. अर्थशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापकांकडून आम्हाला खूप शिकायला मिळाले असं ते म्हणाले.
यावेळी जितेंद्र अडोकार,गिरीश कोळी,रमेश पांडव,अनंत पाठक,संजय उपासनी,माधव फडे,सुरेश महाजन,कामिनी पाटील,राजश्री पांडव हे विद्यार्थी उपस्थित होते.

फोटो कॅप्शन – गुरुपौर्णिमेनिमित्त प्रा ए.डी. गोस्वामी यांचा सन्मान करताना रमेश पांडव,अनंत पाठक,जितेंद्र आडोकार, गिरीश कोळी,संजय उपासनी,माधव फडे,सुरेश महाजन, कामिनी पाटील,राजश्री पांडव आदी.