यावल – तालुक्यातील कोळवद येथील शेतकऱ्यांने भुसावळ येथील एका प्रख्यात बी बियाणे दुकानातून ( शेतकऱ्या कडे बियाणे खरेदीचे बिल आहे ) नावाजलेल्या कंपनीचे तूर पिकाचे बियाणे गेल्या १५ दिवसांपूर्वी खरेदी करून आपल्या शेतात तुर पेरणी केली असता तुर पिक उगवले नसल्याने शेतकऱ्याने संताप व्यक्त केला आहे कंपनीच्या संबंधित माणसांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी केली असता कंपनीमार्फत शेतकऱ्याला उडवा उडवीची उत्तरे देऊन यात कंपनी आणि तुम्ही एकमेकाचे काहीच करू शकणार नाही असा सल्ला दिला. व शेतकऱ्याचे झालेले आर्थिक नुकसान व पेरणीची जी वेळ वाया गेली त्याबाबत पर्यायी व्यवस्था न केल्याने याबाबत आता तालुका कृषी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी काय कारवाई करणार..? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष वेधून आहे.



