जनता एक्सप्रेस मध्ये मोबाइल चोरी करणारी टोळी शोध पथकाच्या ताब्यात –

जळगांव – जनता एक्सप्रेस अप मधून दिनांक २ जून रोजी ११.५० वाजेच्या सुमारास रोहीत विमल यादव वय-23 रा. भवानीपुरा राजधाम जिल्हा पुर्णिया राज्य बिहार सोबत दोन मित्र असे पटना-ते-मुंबई जात असतांना यातील ३ ते ४ अनोळखी इसमाने यांनी फिर्यादी व त्यांचे मित्र झोपलेले असतांना त्यांच्या कडील ६०,०००/- रु एकुण किंमतीचे तिन मोबाईल व रोख रुपये असे चोरुन नेल्याबाबत चाळीगाव लोहमार्ग पोस्टेला सिसिटीएनएस नं.१०२/२०२४ भादवि कलम- ३७९,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्हांत आर पी एफ जळगाव यांचे कडून मिळालेल्या सिसिटीव्ही फुटेज वरुन संशयित आरोपी गुरुजितसिंग सुजानसिंग बावरी वय २५, रा. शिरसोली नाका, तांबापुरा जळगाव.शेख अजर शेख मजर वय २८, रा. पाण्याच्या टाकीच्या समोर सुप्रिम कॉलनी जळगाव. सुधिर सुभाष भोई वय १९ रा. रामेश्वर कॉलनी जळगाव., अल्ताफ फिरोज खान वय- २० रा. रामेश्वर कॉलनी जळगाव यांची पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारा वरून या चारही आरोपी यांना दिनांक २ जून रोजी दुपारी ३. वाजता जळगाव शहरातील मेहरुन परीसरातुन ताब्यात घेण्यात आले आहे.

आरोपी यांच्या कडुन गुन्हांतील चोरीस गेलेले मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहे . ही कार्यवाही पोलीस अधिक्षक डॉ महेश्वर रेड्डी जळगाव,अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते व उपविभागिय पोलीस अधिकारी संदीप गावित,जळगाव भाग तसेच पोलीस निरीक्षक बबन मारुती आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलिहा उपनिरीक्षक दिपक जगदाडे, पोहेकों समाधान टहाकळे, पोना विकास सातदिवे, पोना किशोर पाटील, पोना सचिन पाटील, पोकों चंद्रकांत पाटील, पोकों इनाण बेग, पोकों चद्रकांत पाटील अशांनी केली असुन सदर आरोपी यांना चाळीसगांव लोहमार्ग पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसेच जळगाव येथिल रेल्वे सुरक्षा बल अधिकारी पो नि देविप्रसाद मिना, उप निरी के आर तड, पि.डी. पाटील, महेंन्द्र कुसावा, विनोद जेटवे, विनोदकुमार अशांचा सहभाग होता.