भुसावळ – ,
शनिवारी भुसावळ तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे विजांच्या तारासह काही ठिकाणी विजेचे पोल वाकले होते झाडे पडलेली होती. परिणामी शनिवारी जवळपास ८० टक्के भाग अंधाऱ्यात होता. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात अडथळे असतानाही महावितरण कर्मचाऱ्यांकडून रविवारी शहरातील काही भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात होता. मात्र यातही काही ठिकाणी २० तासानंतर वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर तो पुन्हा खंडित झाला आहे. अधिकारी फोन उचलत नाहीय अश्या अनेक तक्रारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना नागरिकांनी केल्या. दरम्यान, महावितरणकडून शहरातील ९० टक्के वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी मात्र अद्यापही काही भाग अंधाऱ्यातच आहे. त्यामुळे एकंदरीत महावितरणचा दावा फोल ठरल्याचे दिसून आलं.
शिवसैनिक करणार आंदोलन
दरम्यान, आधीच पालिकेकडून १० ते १५ दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. अशातच काही भागात अद्यापही वीज पुरवठा बंद असल्याने नागरिकांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. तसेच दुसरीकडे उन्हाळ्या सारखे दिवस सुरु आहेत. त्यात अद्यापावतो काही ठिकाणी वीज पुरवठा बंद आहे. यामुळे पदाधिकाऱ्यांजवळ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला. याबाबतीत कार्यकारी अभियंत्यांनी भेटण्यास नकार दर्शवल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक आक्रमक झालेले असून सोमवार दिनांक ८ मे रोजी महावितरण कार्यलयासमोर आंदोलन पुकारले आहे. जिल्हाप्रमुख समाधान महाजन, तालुका प्रमुख संतोष सोनवणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख निलेश महाजन, तालुका संघटक प्रा.धिरज पाटील, विधानसभाक्षेत्र संघटक बबलू बऱ्हाटे, शहरप्रमुख हेमंत खंबायत, शहरप्रमुख दीपक धांडे शिवसेना आणि सर्व अंगीकृत संघटना आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.
महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्याकडून शहरात ९० टक्के भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तसेच उर्वरित १० टक्के भागातील वीजपुरवठा सोमवारी सुरु होणार असल्याचे सांगितले होते. मात्र मंगळवार पर्यंत काही भाग अंधाऱ्यात असून अजून एक दोन दिवस वीज पुरवठा होणार नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे.



