जळगाव -( तुषार वाघुळदे) जिल्ह्यात आज विविध साहित्य- सांस्कृतिक संस्थांच्यावतीनं मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आला..
शहरातील महाबळ रोडवरील भाऊंचे उद्यानातील अँफी थिएटर परिसरात सायंकाळी कविवर्य कुसुमाग्रज म्हणजेच तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला..
विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग , अखिल भारतीय साहित्य परिषद तसेच संस्कार भारतीतर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते..
अध्यक्षस्थानी प्रा.मनिष जोशी ,तर उदघाटक म्हणून कवयित्री माया धुप्पड ह्या होत्या ,प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक शरदचंद्र छापेकर,आकाशवाणीचे सेवानिवृत्त अधिकारी सुधीर ओखदे ,स्वानंद झारे, संस्कारभारतीचे श्री.रावतोळे ,अखिल भारतीय साहित्य परिषदेचे पुरुषोत्तम पाटील आदींची उपस्थिती होती..
प्रारंभी कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला..
कार्यक्रमात प्रा.छापेकर यांनी ” मराठी भाषेची महती ” या विषयावर मार्गदर्शन केले.त्यानंतर कवी कुसुमाग्रज यांची गाजलेली गाणी , कवितांचे सादरीकरण , भारुड , नाट्यछटा, लोककला ,गवळण आणि गोंधळ आणि स्वातंत्र्याची गौरव गाथा कलाकारांनी खूपच सुरेख सादर केली , प्रेक्षकांनी मनापासून दाद दिली.माय मराठीच्या या उत्सवात उपस्थितांमध्ये साहित्यिक प्रा.प्रकाश महाजन ,कलावंत व निवेदक तुषार वाघुळदे, डॉ.विजय लोहार, डॉ.सुभाष महाले, कलाप्रेमी चंदू नेवे , किशोरी राणे ,शामकांत बाविस्कर ,सुनील पाटील,राज अत्तरदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते..
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाखा देशमुख यांनी केले.



