उद्योग क्षेत्रामध्ये तरुणांनी पसंती दाखवली पाहिजे आ. संजय सावकारे

वरणगाव – खासगीकरणामुळे शासकीय सेवेतील संधी कमी होत आहे तर खाजगीकरणामुळे कामाच्या तासिका वाढले आहेत त्या तुलनेत पगार कमी तर दुसऱ्या बाजूला गलगंड पगार असतानादेखील कामाच्या व्यापामुळे तरुण पिढी दबली गेली आहे या मधून सुटका पाहिजे असेल तर तरुणांनी उद्योगाच्या संधी हेरल्या पाहिजे त्यामधील शिक्षण घेतले पाहिजे व स्वतःचा उद्योग उभा करून इतरांना नोकरीच्या संध्या उपलब्ध करून दिल्या पाहिजे यामुळे स्वतः सोबतच इतरांना देखील स्वावलंबी बनवू शकतात याकरिता तरुणांनी उद्योग क्षेत्रामध्ये पसंती दाखवली पाहिजे असे प्रतिपादन आमदार संजय सावकारे यांनी वरणगाव येथे केले

मराठा समाज मंगल कार्यालयामध्ये संत रविदास जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर संजय भटकर तर प्रमुख पाहुणे म्हणून फुलगाव सरपंच वैशाली टाकोळे सी. एस सपकाळे उपस्थित होते यावेळी संत रविदास यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी बोलताना संजय सावकारे म्हणाले की तरुणांना रोजगाराच्या संधी शोधून त्यासाठी बँकेकडे कर्ज मागणी केल्यास भाग भांडवल उपलब्ध करता येऊ शकते मात्र या भांडवलाचा योग्य पद्धतीने उपयोग करून त्याची परतफेड केल्यास पुन्हा नव्याने पुढील उद्योगात वाढ होण्यासाठी बँकेकडून कर्ज मिळू शकते

प्रमुख वक्ते डॉक्टर संजीव भटकर यांनी सांगितले की समाजाची प्रगती झाली मात्र आपल्यातील संवेदना बोथट झाल्या आहेत अजूनही आपले बांधव आर्थिक परिस्थितीशी झुंज देत आहेत जे पुढे गेलेत त्यांनी इतरांसाठी पुढाकार घेऊन त्यांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलणे गरजेचे आहे यामुळेच समाजाची प्रगती होऊ शकते 

तर सुनील वानखेडे यांनी समाजातील तरुणांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करून त्यांना योग्य दिशा दाखवली पाहिजे अभ्यास करण्याच्या पद्धती व पुढील वाटचालीस असलेल्या संधी याचा विचार केला पाहिजे यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शैलेंद्र अहिरे यांनी तर आभार महेश सपकाळे यांनी मानले

कार्यक्रम यशस्वीतेसाठी शांताराम सुरळकर, राजेंद्र परसे, अनिल डोयसे, महेश सपकाळे, गणेश चिमणकर, नारायण वाघामारे, योगेश सुरळकर, भरत निंबाळकर, ज्ञानेश्वर डांगे, भीमराव गव्हाळे, संजय डोळसे, जग्गु तायडे, सचिन सपकाळे, गणेश वाढे,रोहित गवळे,शंकर निंबाळकर,ज्ञानेश्वर ठोसर, शिवाजी ठोसर,वैभव लोखंडे यांनी परिश्रम घेतले