भुसावळ : जय गणेश फाउंडेशन संचलित जय गणेश ज्येष्ठ नागरीक संघाचा दहावा पदग्रहण सोहळा नुकताच संपन्न झाला

यावेळी विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, नाहाटा महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, संघाचे मावळते अध्यक्ष विलास चौधरी, मावळते सचिव अशोक चौधरी, नूतन अध्यक्षा सुनंदा औंधकर, सचिव जयश्री ढाके यांची उपस्थिती होती ‘अनुभूती’ या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनीं अपप्रवृत्तींचा बिमोड करण्यासाठी ज्येष्ठांनी पोलिसांचे कान, डोळे व्हावे असे आवाहन करीत म्हणाले की , ज्येष्ठ नागरीकांची छाया वटवृक्षासमान असते. सुसंस्कृत समाजनिर्मितीचा प्रमुख घटक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. चुकलं तर कान पकडण्याचा त्यांना तेव्हढा अधिकार आहे. असे जय गणेश फाउंडेशन संचलित जय गणेश ज्येष्ठ नागरीक संघाच्या दहाव्या पदग्रहण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना गायकवाड़ यांनी सांगीतले.
यावेळीअध्यक्षा- सुनंदा औंधकर, उपाध्यक्ष सुरेश पाटील, लक्ष्मीबाई सुरळकर, सचिव जयश्री ढाके, सहसचिव सुरेश पाचपांडे, कोषाध्यक्ष शांताराम बोबडे, ऑडिटर सोमा डोळे, पदसिद्ध सदस्य विलास चौधरी, अशोक चौधरी, सदस्य मंगला वाणी, सुलोचना वारके, रेखा भालेराव, के. टी. नारखेडे, भास्कर पाटील, अशोक पाटील, सल्लागार आजपर्यंत झालेले सर्व अध्यक्ष यांचा कार्यकारिणीत समावेश आहे.
गत काळात केलेल्या कामाचा आढावा विलास चौधरी, अशोक चौधरी यांनी सादर केला. आर्थिक अहवाल वाचन कोषाध्यक्ष महादेव बोबडे यांनी केले. त्यानंतर नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.तर ज्येष्ठ नागरीक संघातील सर्व सदस्य समाजहितैषी भावनेने विचारांचे आदान-प्रदान करतात. त्यांचा सहवास, अनुभव गेल्या दशकभरापासून लाभतो आहे. अर्थात, जाणीवा समृद्ध होण्यासाठी ते खर्या अर्थाने आमचे पाथेय (रस्ता दाखवणारे मार्गदर्शक) आहेत. संकटांवर मात करण्याची ऊर्जा त्यांच्या पाठबळातून मिळते, अशी भावना माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी व्यक्त केली.
माजी अध्यक्ष डी. एस. पाटील, विलास बेंद्रे, मंगला वाणी, प्रकाश विसपुते, मुरलीधर पाटील, दिनकर जावळे, विलास चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. तर या ज्येष्ठ नागरीक संघाचे संस्थापक अरुण मांडळकर, नेमीचंद महाजन यांचे स्मरण करून त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. जय गणेश फाउंडेशनचे समन्वयक गणेश फेगडे यांच्यासह पदाधिकार्यांनी यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले
.


