महाराष्ट्र सरकार कायम विद्यार्थी हितांच्या निर्णयांना प्राधान्य देते –
जिल्ह्यातील इयत्ता 10 आणि इयत्ता 12 वीच्या विद्यार्थी आणि पालकांनीं शांतता राखावी – महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष प्रा, विनोद हिम्मतराव गायकवाड, यांचे आवाहन :
भुसावळ – महाराष्ट्रातील तसेच जळगांव जिल्ह्यातील इयत्ता 10 आणि इयत्ता 12 वीच्या सन 2021/22 परीक्षेला समाविष्ट झालेल्या तमाम विद्यार्थी आणि पालकांनीं आंदोलन करून रस्त्यावर मोर्चे काढून आपला या परीक्षा कालावधी मधील अती महत्वाचा वेळ वाया घालू नका, महाराष्ट्र सरकार कायम विद्यार्थी हिताचे निर्णयांना प्राधान्य देते, शिक्षण क्षेत्रातील तज्ञ तसेच सन्माननीय शिक्षण मंत्री सौ, वर्षाताई गायकवाड राज्य मंत्री बच्छु भाऊ कडू आपल्या हक्काचाच निर्णय घेतील यात तिळमात्र शंका नाहीच परंतु सध्या विद्यार्थ्यांनी शांतता राखावी आणि संपुर्ण एकाग्र चित्ताने अभ्यास कडे लक्ष द्यावे जेणे करून आपले वर्ष वाया जाणार नाही,कारण 10/12 हाच आपल्या जीवनाचा पाया असून आपण सर्व प्रथम आपल्या अभ्यासा कडे लक्ष केंद्रित केले पाहिजे,आपल्या समस्यांचे समाधान नक्कीच होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष प्रा, विनोद गायकवाड, यांनी आवाहन केले आहे .



