भुसावळ : भुसावळ तालुक्यातील हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे धरणाची पातळी वाढली आहे.

बुधवारी दुपारी एक वाजता धरणाचे 41 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आल्याने तापी नदीला पूर आला आहे. धरणात 45.70 टक्के जलसाठा असून प्रति सेकंद 2327 क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या पाच तासात 3.3 मिलिमीटर पाऊस झाल्याचे सूत्रांनी सांगितले. धरणतून पाणी सोडण्यात आल्याने तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.


