भुसावळ (प्रतिनिधी )-
येथे नुकताच संपन्न झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील यांना वॉर्डांमध्ये एकही उमेदवार निवडून न आल्याने सादा भोपळाही फोडता आलेला नाही तर गावात भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने भाजपाची सरशी तर राष्ट्रवादीला गावात हार पत्करावी लागली आहे यामुळे जिल्हाध्यक्षांना नामुष्कीची वेळ आलेली आहे युवकचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली होती गावात संपन्न झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत लोकमान्य ग्राम विकास पॅनल व भारतीय जनता पार्टी पुरस्कृत ग्रामविकास पॅनल यांच्यात 17 जागांसाठी सरळ लढत होती पैकी भारतीय जनता पार्टीने दहा जागा मिळवून स्पष्ट बहुमत प्राप्त केलेत्यात दोन जागा चार व आठ या फरकाने पराभूत झाल्या तर राष्ट्रवादीला सात जागांवर समाधान मानावे लागले दरम्यान शिवसेनेने देखील गावातील प्रत्येक वार्डात आपले उमेदवार उभे केले होते मात्रत्यांचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही ही गावातील शिवसैनिकांसाठी चिंतनीय बाब आहे दरम्यान ग्रामपंचायत प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव असलेले सरपंच अनिल पाटील यांना हार पत्करावी लागली आहे त्याबद्दल गावात आश्चर्य व्यक्त होत आहे तर माजी आदर्श सरपंच आनंद ठाकरे यांनीवार्डातील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांना सरळ आव्हान दिले होते वार्ड क्रमांक एक मधील चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत श्री ठाकरे यांनी तिसऱ्यांदा विजय प्राप्त केला आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे दरम्यान निवडून आलेल्या भारतीय जनता पार्टीपुरस्कृत ग्राम विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांचे आमदार संजय भाऊ सावकारे यांनी स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन साकेगाव ग्रामपंचायत राज्यस्तरीय मॉडेल व्हिलेज निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी सहकारय करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले प्रसंगी ग्रामविकास पॅनल प्रमुख संजय पाटील माजी सरपंच अनिल पाटील माणिक पाटील सुभाष कोळी दिलीप सिंग पाटील सुरेश पाटील वामन कचरे सह नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य आनंद ठाकरे भूषण सिंग पाटील सचिन सपकाळे सागर सोनवाल कुंदन सपकाळे योगिता विष्णू सोनवणे सुनिता सुभाष सोनवणे हिराबाई गणेश कोळी मथुराबाई सुरेश पाटील माधुरी गजानन पवार आदींची या ठिकाणी उपस्थिती होती



