भुसावळ- (वार्ताहर) – येथील वरणगांव फॅक्टरी, येथील आयुध निर्माणी महाप्रबंधक एस. चटर्जी यांची कानपूर येथे प्रशासनिक बदली झाली असुन त्यांनी आज पदभार सोडला आहे. तीन वर्षापासुन ते वरणगांव फॅक्टरीत असतांना त्यांनी उत्पादन वाढ, गुणवत्ता, पर्यावरण रक्षण, नवीन उत्पादन, कामगार संघटनांशी सोहार्दपूर्ण संबध, संवाद,मन की बात, आदी उपक्रफ यशस्वीपणे राबविले, यांच्या कार्यकाळात वरणगांव फॅक्टरी विविध पुरस्काराने सन्मानीत करण्यात आली आहे. फॅक्टरीमधील प्रत्येक विभाग, विविध कामगार संघटना, असोशिएशनने त्यांना निरोप. समारंभ आयोजित केला होता.



