कांदा निर्यात बंदीच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागा तर्फे प्रांताधिकारी यांना निवेदन ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागा तर्फे केंद्रातील भाजप सरकारने शेतकऱ्यांचा कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ भुसावळ येथील प्रांताधिकारी कार्यालय येथील अधिकारी योगिता गोरडे यांचेशी चर्चा करुन जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे यांच्या नेतृत्वाखाली आज बुधवार दिनांक १६ रोजी निवेदन देण्यात आले.
केंद्रातील भाजप सरकारने शेतकऱ्यांचा कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागा तर्फे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांचे आदेशानुसार व जळागांव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अँड.संदिप पाटिल यांच्या सुचनेनुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्यक्रमाचे समन्वयक योगेंद्र पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले.
यावेळेस जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे,जिल्हा सरचिटणीस रहीम कुरेशी,इस्माईल गवळी,महेबूब खान,गफुर गवळी,काँग्रेस अनु.
जाती विभागाचे शहराध्यक्ष सुनिल जोहरे,उपाध्यक्ष विनोद पवार,कुणाल सुरळकर,विक्रम वानखेडे,सुजाता सपकाळे, सपना पगारे हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *