वरणगांव (प्रतिनिधी )-
येथील ग्रामीण रुग्णालयात आज पर्यंत जवळपास साडेसातशे रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे . यापैकी आठ रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले असल्याची माहिती डॉॅ क्षितीजा हेडवे यांनी दिली आहे .
कोरोणा आजाराचा प्रादुर्भाव सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीला एका दिवसाला दीडशे ते दोनशे रुग्ण तपासणीसाठी करण्यात येत होती सर्व कर्मचारी रात्रंदिवस मेहनत घेऊन रुग्ण तपासणी करीत होते सर्व खबरदारी घेण्याची रुग्णांना सांगितले जाते तसेच त्यांच्या हातावर शिक्का मारून संबंधितांचे नाव पोलीस स्टेशनला कळविले जाते. या रुग्णावर १४ दिवस लक्ष ठेवण्याचे काम गावातील पोलीस पाटील करीत असतात वेळोवेळी शासनाचे नियमानुसार तपासणीनंतर औषध उपचार केले जातात तसेच वरणगाव परिसरात ३२ खेड्यांचा परिसर असल्याने तसेच परिसरातील बहुतेक नागरिक पुणे ,मुंबई ठिकाणी राहत होते .विशेष म्हणजे युवक शिक्षणासाठी किंवा नोकरीनिमित्त तेथे गेलेले होते ते आल्यानंतर त्यांची तपासणी ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली आहे. याठिकाणी विलगीकरण कक्ष उभारण्यात आलेले असून सर्व सुरक्षा साहित्य वापरून तसेच रुग्णाला अंतर ठेवूनच रांगेत उभे करून तपासणी करून दक्षता पाळत आहोत .
या कामात कामगार संघटनेचे मिलिंद मेढे ,वैद्यकिय अधिकारी डॉ दर्शना पावरा , डॉ . प्रियंका कोंगे , हेड नर्स अर्चना वासनिक , प्रिती आराक , केदारे व ग्रामीण रुग्णालय कर्मचारी मदत करीत आहे .
मालेगावच्या घटनेचा निषेध
मालेगाव येथे घडलेली घटना ही दुर्दैवी असून अशा प्रकारच्या घटना होऊ नये यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात संघटनेचा ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने निषेध करण्यात आला .
नागरिकांनी सहकार्य करावे -डॉ क्षितिजा हेडवे
कोरोणा आजाराचा प्रादुर्भाव हा संसर्गातून होऊ शकतो याकरिता ज्यांना घरात राहणे सांगितले त्यांनी घरातच राहावे व इतरांनी घराच्या बाहेर पडू नये यामुळे रूग्णांच्या संख्येला आळा घालता येऊ शकतो.असे आवाहन डॉ क्षितिजा हेडवे,
वैद्यकीय अधिकारी वरणगाव यांनी केले आहे .



