आज निर्भयाला जो न्याय मिळाला त्याच्यामुळे न्यायव्यवस्था जिवंत आहे यावर सर्वसामान्यांचा विश्वास अधिकच दृढ़ झाला आहे फक्त दुःख एवढंच वाटतं की आम्ही न्याय व्यवस्थेमध्ये काम करीत असतानाही निर्भयाला सहा ते सात वर्षांनी न्याय मिळाला ही न्यायव्यवस्था आहे . अशा संदर्भातील गुन्ह्यां करता तीन महिन्यांमध्ये न्याय मिळणं आवश्यक आहे अशा दोषींवर योग्य ती कारवाई होईल अशा गुन्हेगारांना सरकारने किंवा न्यायव्यवस्थेने लवकरात लवकर शिक्षा दिली पाहिजे त्यामुळे अशा घटनांना कुठेतरी चाप बसेल अश्या घाणेरडया विकृत व विकृतीला आळा बसण्यासाठी न्यायव्यवस्था कुठेतरी हातभार लावते यात शंकाच नाही फक्त एकच आहे अशी प्रकरणे एका महिन्यात निकाली काढावी जेणेकरून गुन्हेगारांना गुन्ह्यातील पुरावे नष्ट करायला वाव मिळू नये असे मत अँड. अश्विनी डोलारे यांनी निर्भयाचा निकाला बद्दल व्यक्त केले
न्यायव्यवस्थेवर सर्वांचा विश्वास बसला आहे –अॕड.अश्विनी डोलारे

