भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ ते जामनेरच्या दरम्यान असणार्या महादेव तांडा गावाजवळ आज १४ रोजी रात्री 12 वाजेचे सुमारास गहु वाहून नेणार्या एका ट्रकला अचानक आग लागल्याने यात ट्रक मालकाचे एकूण ८ लाख ७० हजार ४९२ रूपयांचे नुकसान झाल्याची घटना येथे घडली . यावेळी भुसावळ येथील अग्निशामन दलाच्या पथकाने व ग्रामस्थानी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. दरम्यान, या आगीमुळे भुसावळ ते जामनेर दरम्यानची वाहतूक काही काळ ठप्प झाली. दोन्ही बाजूला दोन ते तीन किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्यां होत्या .
भुसावळ येथून जामनेर कडे जाणाऱ्या रस्त्यावरील मांडवे गावाजवळ मध्यप्रदेश येथील खंडवा जिल्ह्यातील प्रधान गाव येथील ट्रक क्रमांक एमपी 12 एच ओ 192 हा ट्रक 13 मार्च रोजी औरंगाबाद येथे जाण्यासाठी निघाला यावेळी यामध्ये ट्रक मालक शेख वाहिद शेख मौहम्मद राहणार खंडवा यांनी लोकवान गव्हाचे 260 पोते औरंगाबाद येथे देण्यास भरून दिले होते . १४ रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास ट्रकच्या डिझेल टाकी जवळून धुर निघत असल्याचे रस्त्याने ट्रकच्या पाठिमागुन येणाऱ्या मोटरसायकल स्वाराचे लक्षात आले त्याने ट्रक चालकाच्या निदर्शनात ही बाब आणून दिली चालकाने ट्रक थोडा पुढे नेला मात्र या धुराचे आगित रूपांतर झाले व आग लागली ,
आग जास्त भडकायला लागली . हा हा म्हणता आगीची वार्ता गावात गेली व अवघ्या क्षणात यावेळी गावकरी जमा झाले यावेळी काहिनी गव्हाचे पोते लांबविले . अचानक लागलेल्या आगीत ट्रकचे कैबिन, इंजिन , टायर , व 18 टन 285 लोकवान गव्हाचे पोते गहु जळून बेचिराख झाला ,
दरम्यान घटनेची माहिती रात्री तालुका पोलिसांना कळताच त्यांनी भुसावळ येथून अग्निशमन बंब घटनास्थळी रवाना केला अग्निशमन कर्मचारी व ग्रामस्थ यांनी आग आटोक्यात आणली . या आगीत ट्रकचे एकूण किंमत 3 लाख 50 हजार तर 285 लोकवान गहु पोत्यांचे 5 लाख 20 हजार 492 असे एकूण आठ लाख 70 हजार 492 रूपयांचे नुकसान झाले 14 रोजी रात्री ट्रक मालक भुसावळ येथे पोहचल्या नंतर ट्रक चालक शिराज शहा छोटू शहा याने तालुका पोलिस ठाण्यात खबर दिल्यावरुन अकस्मात आगीची नोंद करण्यात आली असून तपास हेड कॉन्स्टेबल यूनुस शेख करीत आहे .
ट्रक मधील गव्हाचे (अर्ध जळीत व चांगले , भिजलेले गव्हाचे पोते) हाताला येईल ते पोते नजिकच्या लोकांनी पटापट वाहून नेले यावरुन गावकऱ्यांची चांगलीच चंगळ झाल्याचे दिसून आले .
दरम्यान भुसावळ येथील अग्निशमन बंबाचे कर्मचारी यांनी आग आटोक्यात आणली .घटनास्थळी गावकरी यानी देखील आग विझवण्यास मदत केली .यामुळे अनर्थ टळला.



