भुसावळातील अभियंता खून प्रकरण : आरोपींना 5 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी


भुसावळ –

शहरातील श्रीराम नगरातील तरुण अभियंत्यांच्या खून प्रकरणात कोठडी संपल्याने बुधवारी पाचही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता आरोपींना पुन्हा तीन दिवसांची अर्थात 5 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. शहरातील श्रीराम नगरातील सिव्हील इंजिनिअर विलास दिनकर चौधरी या तरुणाच्या खून प्रकरणी संशयीत आरोपी अक्षय प्रकाश न्हावकर (23 रा.चक्रधर नगर भुसावळ), अभिषेक राजेश शर्मा (21, रा.चमेली नगर, भुसावळ) व आकाश गणेश पाटील (21 रा.नारायण नगर, भुसावळ), मयुरेश राजेश महाजन (20, रा.दत्तनगर, भुसावळ) व हत्याराचा पुरवठा करणार्‍या विशाल टाक (22, रा.वाल्मिक नगर) या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची अर्थात 5 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *