-भुसावळ (प्रतिनिधी)-
जिल्ह्यातील सिंचन व बिगर सिंचनाच्या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण असलेल्यां हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील तापी व पूर्णा नदीच्या उगमस्थान परिसरात शनिवारी झालेल्या दमदार पावसाने धरनात पाण्याची आवक वाढली आहे .
रात्री 9 वाजेला हतनूर धरणाचे २६ दरवाजे अर्ध्या ( ०.५० )मीटरने उघडण्यात आले होते या दरवाज्यातुन २३, ८७६ क्युसेक्स इतक्या प्रचंड प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे . त्यामुळे तापी नदी दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. धरणाची जलपातळी २०९.६७० मीटर पर्यंत पोहचलेली असून धरणात आज रोजी १८४.१० दशलक्ष घनमीटर इतका जलसाठा शिल्लक आहे. लाॕकडाऊनमुळे यावर्षी रेल्वे , आयुध निर्माणी, दीपनगर वीजनिर्मीती केंद्र या ठिकाणी पाण्याचा वापर कमी प्रमाणात झाला यामुळे यंदा जलसाठा मुबलक प्रमाणात शिल्लक आहे. तसेच भुसावळ, मुक्ताईनगर , बोदवड, यावल , रावेर , या तालुक्यातील ३८ हजार हेक्टरवरील शेतीला याचा लाभ होणार असल्याची माहिती हतनूर धरणाचे उपअभियंता पी.एन. महाजन यांनी दिलेली आहे.



