मुक्ताईनगर ( प्रतिनिधी ) – खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकऱ्यांना वेळेवर योग्य दरात उत्कृष्ट दर्जाचे बी-बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्या वतीने मुक्ताईनगर तालुका कृषी अधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली .

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खरीप हंगामाच्या पेरणीचे दिवस जवळ आल्यानंतर अनेकदा बी-बियाणे वेळेवर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीच्या दराने बियाणे खरेदी करावे लागतात. तसेच उत्कृष्ट दर्जाऐवजी निकृष्ट दर्जाचे बी-बियाणे शेतकऱ्यांना दिले जात असल्याने पिकांचे मोठे नुकसान होते.


