भुसावळ येथील गायत्री गौर यांचा खुलासा: रजनी सावकारेंचा जात पडताळणी आक्षेप खोटा, पुरावे समितीने दुर्लक्षित केले

भुसावळ, (प्रतिनिधी) : भुसावळ शहरातील नगराध्यक्षपदाच्या जात पडताळणी वादात नवे वळण आले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना गायत्री गौर (भंगाळे) यांनी निवडणुकीत पराभूत झालेल्या रजनी संजय सावकारेंनी (गुजरात रहिवासी) घेतलेला जातीनुसार आक्षेप हा पूर्णपणे खोटा असल्याचे सांगितले. सावकारेंनी महाराष्ट्र शासनाच्या नियमांचा भंग करून चांभार जातीचा दाखला मिळवला असून, त्यांच्यावरच पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप गोर यांनी केला.
गौर यांनी सांगितले, “आम्ही जात पडताळणी समितीकडे सगळे पुरावे सादर केले. यात महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय परिपत्रक, सुप्रीम कोर्टाचे अयूब खान जजमेंट, गुजरातमधील शाळा-कॉलेजचे शिक्षण दाखले आणि १५ एप्रिल २००१ रोजी भुसावळेत लग्नानिमित्त स्थलांतरित झाल्याचे कागदपत्रे जोडली. सावकारे महाराष्ट्र रहिवासी नसतानाही त्यांनी निवडणूक लढवली आणि आमच्यावर आक्षेप घेतला.”
त्या पुढे म्हणाल्या, “२००५ मध्ये सावकारेंनी पतीचे कागदपत्र लावून चांभार जातीचा दाखला मिळवला, जो सरस्वती महाराष्ट्र शासनाच्या नियमांचा भंग आहे. समितीने मात्र मंत्रीपदाच्या दबावाखाली हे पुरावे बाजूला सारले आणि आम्हाला (महाराष्ट्र रहिवासी असतानाही) अयोग्य ठरवले.” गोर यांनी सर्व कागदपत्रे पत्रकार परिषदेत जनतेच्या समोर मांडली आणि माध्यमांमार्फत त्याची माहिती देण्याचे आवाहन केले.
या वादामुळे भुसावळात राजकीय तणाव वाढला आहे