भुसावळ (प्रतिनिधी) – भारतीय जनता पार्टीच्या वतीने पश्चिम बंगाल, आसाम व पुदुचेरी येथील विधानसभा निवडणुकांतील यशानिमित्त भुसावळ शहरात जल्लोष साजरा करण्यात आला.

या प्रसंगी कार्यकर्त्यांनी “भारतीय जनता पार्टीचा विजय असो”, “भारत माता की जय” व “वंदे मातरम” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाला राज्य परिषद सदस्य प्रमोद सावकारे, भाजपा गटनेते युवराज लोणारी, रजनी सावकारे, शहराध्यक्ष संदीप सुरवाडे, जिल्हा उपाध्यक्ष खुशाल जोशी, जिल्हा चिटणीस प्रवीण इखणकर यांच्यासह नगरसेविका आशा कैलास पाटील, मनोज बियाणी, नगरसेवक पिंटू कोठारी, सतीश सपकाळे, रुपेश देशमुख, विशाल जंगले, सुजित भोळे, श्रेयस इंगळे, कैलास पाटील, अल्बर्ट तायडे, जयंत माहुरकर, सागर चौधरी, गौरव आवटे, शंकर शेळके, राहुल तायडे, संतोष ठोकळ, रवी दाभाडे, विलास सातदिवे, नंदकिशोर बडगुजर, चेतन जैन, प्रशांत पाटील, रामशंकर दुबे तसेच माजी तालुकाप्रमुख भालचंद्र पाटील, कुणाल येवले, नगरसेवक संजय नाहाटा, पराग भोळे, मनीष पाटील, योगेंद्र हरणे, वासू बोंडे, गोपी राजपूत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, झालमुरी व पेढ्यांचे वाटप करून सर्वांनी विजयाचा आनंद साजरा केला.


