भुसावळ नगरपरिषदेच्या तहकूब सभांवरून वाद; २४ मार्चला नगराध्यक्षा व २५ नगरसेवकांची सुनावणी

जळगाव, (प्रतिनिधी )— भुसावळ नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभा वारंवार तहकूब करण्यात येत असल्याच्या तक्रारीवरून आता प्रकरण जिल्हाधिकारी पातळीवर पोहोचले असून, २४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सुनावणी होणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने २५ नगरसेवकांना नोटीस बजावली आहे.

सुनावणीस गैरहजर राहिल्यास एकतर्फी निर्णय घेतला जाईल, असा स्पष्ट इशारा नोटीसमध्ये देण्यात आला आहे.

या प्रकरणात वादी म्हणून खालील २५ नगरसेवकांना नोटीस देण्यात आली आहे :
युवराज दगडू लोणारी (गटनेता), शैलजा पुरुषोत्तम नारखेडे (उपनगराध्यक्षा), पूजा प्रेमचंद तायडे, गिरीष सुरेश महाजन, प्राची उदय पाटील, अर्चना विलास सातदिवे, आशिष ईश्वरलाल पटेल, शोभा रणधीर इंगळे, परिक्षीत मुंडलीक ब-हाटे, विशाल राजेंद्र नाटकर, प्रिती मुकेश पाटील, अनिता सतीष सपकाळे, पुनम वसंत पाटील, सोनी संतोष बारसे, प्रिया बोधराज चौधरी, मेघा देवेंद्र वाणी, राजेंद्र दत्तू आवटे, सिमा प्रशांत नरवाडे, निर्मल रमेश कोठारी, महेंद्रसिंग हनुमानसिंग ठाकुर, प्रकाश रमेश बतरा, किरण भागवत कोलते, आशा कैलास पाटील, सोनल रमाकांत महाजन, डॉ. छाया मुरलीधर फालक (देशमुख).

नगरपरिषद भुसावळच्या नगराध्यक्षा आणि मुख्याधिकारी यांना प्रतिवादी म्हणून नोटीस बजावण्यात आली आहे.

नगरपरिषदेच्या सभा वारंवार तहकूब होत असल्याने शहरातील विकासकामे, अर्थसंकल्प मंजुरी व इतर निर्णयांवर परिणाम होत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम १९६५ च्या कलम ३०८ अंतर्गत त्यांनी अपील दाखल केले आहे.

२४ मार्च रोजी दोन्ही पक्षांना आपली बाजू मांडावी लागणार आहे. नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांना सभा तहकूब करण्यामागील कारणांचा खुलासा करावा लागेल.
या सुनावणीनंतर काय निर्णय होतो, याकडे भुसावळकरांचे लक्ष लागले आहे.