भारताच्या विकासाच्या पायाभरणीत अल्पसंख्यांक समुदायाचे मोठे योगदान” – प्रा. जोगेश्वरी पाटील


भुसावळ (प्रतिनिधी ) –
भुसावळ कला , विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागांतर्गत अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी‌.एच. ब-हाटे हे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. जोगेश्वरी पाटील ह्या होत्या.प्रमुख उपस्थिती अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस.टी. धुम आणि विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. विलास सोळुंके प्रा. संगीता भिरुड डॉ.साहेबराव राठोड यांची होती.
प्रा. जोगेश्वरी पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना “लोकशाहीचे यश हे बहुसंख्य लोक अल्पसंख्याकांना किती सुरक्षित ठेवतात यावर अवलंबून असते ह्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विधानाचा दाखला देत संविधानाने सर्वांना सर्वप्रथम ते भारतीय असल्याचे बिंबवले आहे” असे अधोरेखित केले.”अल्पसंख्यांक समुदायातील लोकांसाठी सरकारने अनेक प्रकारच्या शैक्षणिक व कौशल्य विकास योजना आणून त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण केली आहे. अल्पसंख्यांक समुदायाने खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्मितीत अनमोल योगदान दिलेले आहे”असे स्पष्ट केले.
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. बी.एच.ब-हाटे यांनी “भारत हा सर्व समुदाय, जाती ,धर्म ,पंथ यांच्या एकत्रित प्रयत्नातून उभा राहिला आहे आणि जगभरात तो त्याच्या सहिष्णुतेसाठी ओळखला जातो” असे मत नमूद केले ‌.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. विलास सोळुंके यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रिया लोहार यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. सुनील अडकमोल यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास विभागाच्या विद्यार्थिनी कु. ऋचा मिटकरे, कु. नयना पाटील ,कु. फाल्गुनी चौधरी, कु. आश्विनी गुरव, कु. तेजस्विनी पाटील, कु. राशि मेने आणि अमोल गुजर यांनी श्रम घेतले. याप्रसंगी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.