हृदयद्रावक ; टायर फुटल्याने कारने पेट घेतला, विवाहितेचा कार मध्येचं होरपळून मृत्यू ;

जामनेर – अचानक कार चे टायर फुटल्याने कार ने पेट घेतला. आणि विवाहितेचा कारमध्ये च होरपळून मृत्यू झाल्याची घटना पहुर येथे घडली. जळगाव–छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर पहूरजवळ १० नोव्हेंबर रोजी दुपारी अपघात झाला. जान्हवी संग्राम मोरे (वय 21, मूळ रा. गुलखेडा जि. बुलढाणा) या विवाहित महिलेचा कार मध्येचं जागीच मृत्यू झाला. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामसिंग जालीमसिंग मोरे हे पत्नी जान्हवी मोरे सह चारचाकीतून छत्रपती संभाजीनगरकडे जात होते. त्यांची कार पिंपळगाव फाटा, पहूरजवळ आली असता, अचानक कारचा टायर फुटला. टायर फुटल्याने कारवरील नियंत्रण सुटले आणि ती महामार्गावरील दुभाजकावर आदळली. अपघातानंतर कारमधून तत्काळ धूर आणि आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या.घटनास्थळी गाडीची आग विझविण्यासाठी वाकोद येथून टँकर व जामनेर नगरपरिषद अग्निशमन दलाची गाडीही दाखल झाली. गाडी ला लागलेली आग विझल्यानंतर जान्हवी मोरे यांच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली.या दुर्दैवी अपघातामुळे हळहळ व्यक्त होत आहे. पहूर पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे. संग्राम मोरे यांना जळगाव येथील शासकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.