भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावर संपूर्ण भारतात लॉककडाउन सुरु आहे अशाही परिस्थितीत मागील एका महिन्यात मध्य रेल्वेने १,४१५ रॅक्स (मालगाड्या) मध्ये ७०,३७४ वॅगन मालवाहतूक केली. मध्य रेल्वेच्या मुंबई, नागपूर, भुसावळ, सोलापूर आणि पुणे विभागातून दररोज लोडिंग/ अनलोडिंगसाठी विविध टर्मिनल्सवर सुमारे ७५ रॅक (मालगाड्या) हाताळले जात आहेत, ज्यात अन्नधान्य, वीज निर्मितीसाठी कोळसा आणि सिमेंटसारख्या इतर वस्तूंचा समावेश आहे.
२४/७ तत्त्वावर सतत कार्यरत असलेल्या गुड्स शेड, स्थानके आणि नियंत्रण कार्यालयांमधील रेल्वे कर्मचार्यांनी २३ मार्च ते २२ एप्रिल २०२० पर्यंत १,४१५ रॅकमध्ये आवश्यक वस्तूंच्या ७०,३७४ वॅगन लोड करणे शक्य केले आहे.
रेल्वेच्या मुंबई, नागपूर, भुसावळ, सोलापूर आणि पुणे विभागात २५२ वॅगनमध्ये धान्य, ४८४ वॅगनमध्ये साखर, ३४,४९७ वॅगनमध्ये कोळसा, २५,३८० वॅगन्समध्ये कंटेनर, ५,१८३ वॅगन्समध्ये पेट्रोलियम उत्पादने, १,८०२ वॅगनमध्ये खते, ६३५ वॅगन्समध्ये स्टील, २५२ वॅगन्समध्ये डि-ऑईल केक आणि ११७ वॅगनमध्ये सिमेंट व १,७७२ वॅगनमध्ये विविध वस्तू भरल्या गेल्या. याचबरोबर सुमारे २२० पार्सल गाड्या वेळापत्रकानुसार चालविल्या जात असून त्यामध्ये औषधे, भाज्या, नाशवंत वस्तू, पोस्टल बॅग इत्यादी आवश्यक वस्तू देशभरात नेल्या व पाठवल्या जात आहेत.
मध्य रेल्वेने २१एप्रिल२०२० पर्यंत २हजार टनाहून अधिक जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली होती ज्यात औषधे, वैद्यकीय उपकरणे, फळे, भाज्या, अंडी, ज्यूट बियाणे, टपाल पिशव्या आणि कच्चा माल समाविष्ट आहे. असे
२४ एप्रिल २०२० रोजी प्रसिद्धी पत्रक मध्य रेल्वे, जनसंपर्क विभाग यांनी प्रसिद्ध केले आहे .



