भुसावळ (प्रतिनिधी )-
सध्या कोरोना व्हायरसमुळे सर्वसामान्यांची आर्थिक घडी पूर्णताः विस्कटली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे जगण्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. अशी परिस्थिती ओढावल्याने भुसावळ नगर परिषदने मार्च ते जून या चार महिण्यांची घरपट्टी व पाणीपट्टी कर पूर्णताः माफ करावा अशी मागणी आज दिनांक २२ एप्रिल २०२० रोजी भुसावळ शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्यासह पालिकेच्या मुख्याधिकारी करुणा डहाळे यांच्याकडे केली आहे.
भुसावळसह जिल्ह्यातील सर्व पालिकांनी कर माफ करावा- प्रा.धिरज पाटील
सध्या कोरोनामुळे जगासमोर एक मोठे संकट उभा राहिले आहे. त्याचा सर्वात जास्त फटका सर्वसामान्य लोकांना अधिक बसला आहे. देयात गेल्या मार्चपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे रोजगार, उद्योगधंदे, दळणवाहतूक पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे असे लोकांच्या हाताला कामधंदा नाही, म्हणून परिस्थिती आणखीणच बीकट झाली आहे. एकंदरीत या सगळ्या गोष्टी गांगीर्याने घेत, शहर नागरीकांची चार महिण्यांची घरपट्टी व पाणीपट्टी पूर्णपणे माफ करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील सर्व पालिकेंच्या हद्दीतील घरपट्टी व पाणीपट्टी कर माफ करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे असे प्रा.धिरज पाटील यांनी सांगितले.
कोरोनामुळे सामान्यवर्ग सैरभैर झाला आहे. संसाराचा गाडा हाकण्यासाठी फार कष्ट करावे लागणार आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेला कामगार, मजूरवर्ग, सामान्य नागरिक हा भार सहन करू शकणार नाही म्हणून जिल्हा प्रशासनाने सर्व सामान्य नागरीकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा नागरिकांच्या वतीने होत आहे.



