सतर्क रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) कॉन्स्टेबलने वाचवला जीव
मध्य रेल्वेच्या आरपीएफ कॉन्स्टेबलने एका प्रवाशाचे प्राण वाचवून आपले शौर्य दाखवले आणि “जीवन रक्षक” बनला

मध्य रेल्वेचे आरपीएफ कॉन्स्टेबल श्री राम नारायण सिंह यांनी शौर्य दाखवले आणि एका प्रवाशाला धोक्यातून वाचवले.
दिनांक ३०.०५.२०२५ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरून लोकमान्य टिळक टर्मिनस-कोचुवेली गरीब रथ एक्सप्रेसने गाडी क्रमांक 12201 सुरू झाली तेव्हा एक प्रवासी चालत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करत होता पण तो ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील अंतरात घसरला आणि पडला.
प्लॅटफॉर्मवर ड्युटीवर असलेले मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे आरपीएफ कॉन्स्टेबल श्री राम नारायण सिंह यांनी प्रवाशाला ट्रेनमधून पडताना पाहिले. धाडस दाखवत त्यांनी ताबडतोब धाव घेतली आणि प्रवाशाला धरले आणि त्याला मागे खेचले, ज्यामुळे तो संभाव्य जीवघेणा अपघातापासून वाचला.
घटनेनंतर, प्रवासी अत्यंत अस्वस्थ स्थितीत असल्याचे दिसून आले. घरी कुटुंबाची आपत्कालीन परिस्थिती होती त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जाणे जरूरी असल्याने ट्रेन सुटलेली असतानाही
ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात संतुलन बिघडले. सदर प्रवाशाला समुपदेशन करण्यात आले आणि त्याचा प्रवास सुरक्षितपणे सुरू ठेवण्यासाठी योग्य मार्गदर्शन देण्यात आले.
प्रवाशाचे प्राण वाचवण्यात सतर्कता, समर्पण आणि कर्तव्यभावनेचे एक अद्वितीय उदाहरण मांडणारे श्री राम नारायण सिंह यांना खरोखरच “जीवनरक्षक” म्हणता येईल. या धाडसाच्या कृतीद्वारे, श्री विनोद यांनी इतरांसाठी एक आदर्श ठेवला आहे आणि एक समर्पित रेल्वे कर्मचारी आणि दयाळू मनुष्य म्हणून त्यांचे कर्तव्य पार पाडले आहे.मध्य रेल्वेने, प्रवाशाचे प्राण वाचवण्यात श्री राम नारायण सिंह यांच्या शौर्याच्या अनुकरणीय कृतीचे कौतुक केले आहे . लाखो प्रवाशांचा सुरळीत आणि सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी विविध सतर्क आणि धाडसी रेल्वे पुरुष आणि महिला २४x७ काम करत आहेत.


