किंचित यशाने हुरळून जाऊ नका, ध्येय दूरस्थ ठेवा !आसाेद्यात भीम रमाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॅ. मिलिंद बागुल यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

जळगाव | आसाेद्यात धनजीनगर व आंबेडकरनगरच्या रहिवाशांनी दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गाैरव साेहळा आयाेजित केला. त्यात भीम रमाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॅ. मिलिंद बागुल यांची प्रमुख उपस्थिती हाेती. यशाने हुरळून जाऊ नका. ध्येय उच्च ठेऊन ते गाठण्याचा प्रयत्न करा असा सल्ला त्यांनी दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपअभियंता विजयकुमार मौर्य होते. कार्यक्रमास अॅड. मुकेश कुरीर, रवी देशमुख, बापूराव पानपाटील, आनंद सोनवणे हे मान्यवर अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. बापूराव पानपाटील यांनी विद्यार्थ्यांना, समाजातल्या पालकांना विद्यार्थी जीवनात शिक्षण आणि ज्ञानापलीकडे डोकावण्याची गरज नसून याकरता आपण पालकांनी जबाबदारीने सजग राहून त्यांच्याशी संवाद साधण्याची गरज असल्याचे मत मांडले. मुकेश कुरीर,आनंद सोनवणे व गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थिनीनी समायोचित मनोगत व्यक्त केली. प्रास्ताविक मुकेश सोनवणे यांनी तर सूत्रसंचालन हेमंत बिऱ्हाडे आभार प्रदीप मगरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतीश भालेराव मनोज बिऱ्हाडे, प्रवीण सोनवणे मुन्ना बिऱ्हाडे आदिंनी सहकार्य केले.

या विद्यार्थ्यांचा गाैरव
दहावीच्या परीक्षेत ९३ टक्के प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळवलेल्या तृप्ती बिऱ्हाडे, गुणवंत विद्यार्थी प्रज्ञा कापडणे, देवयानी माळी, हरिता नारखेडे, खुशी बिऱ्हाडे, कोमल भालेराव, दीक्षा भालेराव, रुचिता सूर्यवंशी, संघमित्रा बिऱ्हाडे, विशाखा बिऱ्हाडे, प्रेरणा बिऱ्हाडे, तुषार भालेराव, रोहित बिऱ्हाडे, सुमित बिऱ्हाडे, शिवम बिऱ्हाडे, प्रशांत बिऱ्हाडे, प्रशिक मगरे, सुमित बिऱ्हाडे, दीक्षांत सूर्यवंशी या गुणवंतांचा गाैरव करण्यात आला.